आयुर्वेदिकआरोग्य

सैंधव मिठाचे फायदे …

प्रतिनिधी : – नूतन पाटोळे

1) सैंधव मीठ त्वचेसाठी अतिशय फायद्याचे असून मृत त्वचा याने निघून जाते. तसेच त्वचा पेशी मजबूत आणि तजेलदारदेखील दिसते. तसेच काही आजारपणामुळे, विकारांमुळे नखांच्या खाली जे पिवळसर डाग पडलेले असतात ते काढण्यासाठीदेखील या मिठाचा उपयोग केला जातो.
2) या मिठाच्या सेवनाने चरबी कमी होते. या मिठातल्या खनिज तत्त्व इन्सुलिनला रिअँक्टिव्ह असल्याने साखर खाण्याची किंवा गोड खाण्याची इच्छा कमी होते. रक्तदाब स्थिर ठेवणे, चयापचय क्रिया नियंत्रित करणे, वायुसरणावर नियंत्रण आणि भूक वाढ यासाठीही या मिठाचा उत्तम उपयोग होऊ शकतो.
3) केसांसाठी कंडिशनर म्हणून सैंधव मिठाचा वापर शाम्पू सोबत केला जातो. केस गळती, केसांचे तुटणे कमी होते. सैंधव मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने टॉन्सिल्सवर आराम पडतो. तसेच श्वसनाचे विकार, पोटाचे विकार, सर्दी, डोकेदुखी, खोकला वगैरे लहान-मोठे शारीरिक समस्यांवर सैंधव मीठ अतिशय गुणकारी आहे.
4) पोटाच्या आरोग्यासाठी आणि त्याच्या पाण्याची वाफ श्वसनसंस्थेच्या लहान-मोठय़ा कुरबुरींसाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते. सैंधव मीठ संधिवातावर, काही कीटक चावल्यावर जखम बरी करण्यासाठी देखील वापरतात. ताणतणाव हल्ली फार सर्वसामान्य आजार झाला आहे. कारण अगदी क्षुल्लक असले तरी त्यातून अनेकदा चिडचिड, अस्वस्थता, डिप्रेशन, भूक न लागणे असे आजार डोक वर काढत असतात. सैंधव मिठाच सेवन शरीर आणि मनाला स्वस्थता देते. शांत होण्यास मदत करते.
5) गरम पाण्यात हे मीठ टाकून अंघोळ केल्यासही ताण कमी होतो आणि ताजतवाने वाटते. वातावरणातील प्रदूषित घटक शोषून घेण्याची क्षमता या मिठात आहे. निसर्गाचा तोल सांभाळण्याचं काम देखील हे मीठ करत असते.

Spread the love

Related posts

कच्ची पपई खाण्याचे फायदे…

admin@erp

पालक खाण्याचे फायदे…

admin@erp

गवती चहा पिण्याचे फायदे…..

admin@erp