उत्सवमहाराष्ट्रशैक्षणिक

श्री पांडुरंग विद्या मंदिर, विठ्ठलवाडी येथे गुरुपौर्णिमा साजरी.

प्रतिनिधी : – भगवान खुर्पे

तळेगाव ढमढेरे :(वार्ताहर) गुरुपौर्णिमा दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ म्हणाले ‘माता प्रथम गुरु प्रतिदिन तिचे मनोभावे पूजन करा’ आपला जन्म झाल्यानंतर आपल्याला संस्कार, ज्ञान देणारी प्रथम व्यक्ती ही आपली माताच असते.
या विज्ञानवादी जगात गुरुकृपेशिवाय सर्व काही व्यर्थ.गुरु ज्ञानाचा प्रकाश देतो. असे सांगितले व विविध क्षेत्रातील गुरु शिष्यांच्या जोड्या भाऊसाहेब वाघ यांनी सांगितले.
श्री पांडुरंग विद्यामंदिर विठ्ठलवाडी येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.अनिशा शिंदे या होत्या‌.विशाल कुंभार,प्रवीणकुमार जगताप,बाळासाहेब गायकवाड,संगीता गवारे,योगिता हरगुडे, शुभांगी जाधव,सागर वाणी,विठ्ठल माळी, नरेंद्र गायकवाड या सर्व शिक्षक शिक्षकेतर बांधवांना पेन,गुलाबपुष्प, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.दूर्वा पाबळे,माही गवारी, अंजली मारणे, वैष्णवी लोले या विद्यार्थिनींनी भाषणे केली.यावेळी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त पाचवी ते दहावीच्या वर्ग प्रतिनिधींच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजनंदिनी गवारी हिने केले तर वैष्णवी लोले हिने आभार मानले.

Spread the love

Related posts

” उत्कृष्ट पोलीस पाटील” पुरस्काराने भारती उंद्रे सन्मानित

admin@erp

तळेगाव ढमढेरे उपसरपंचपदी मनोज आल्हाट बिनविरोध

admin@erp

शहर सुरक्षित आणि अतिक्रमणमुक्त करणे ही पी एम आर डी ए ची प्राथमिकता : आयुक्त डॉ. म्हसे

admin@erp