उत्सवमहाराष्ट्रसामाजिक

श्री छत्रपती प्रतिष्ठान संचलित निवासी मतिमंद कृषी शाळेमध्ये दिंडी सोहळा उत्साहात संपन्न.

प्रतिनिधी : – निलेश जगताप

श्री छत्रपती प्रतिष्ठान संचलित निवासी मतिमंद मुलांची कृषी कार्यशाळा शिक्रापूर या ठिकाणी आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज दिंडी सोहळा आयोजित केला होता. या दिंडी सोहळ्यासाठी शिक्रापूर नगरीचे सरपंच रमेश गडदे ,माजी सरपंच भगवानराव वाबळे ,ग्रामपंचायत सदस्य प्रकाशजी वाबळे ,विशाल शेठ गायकवाड ,माजी उपसरपंच विशाल शेठ खरपुडे ,बापूशेठ गायकवाड त्याचप्रमाणे पत्रकार निलेशजी जगताप आणि अनेक मान्यवर दिंडी सोहळ्यासाठी उपस्थित होते, आपल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल रुक्माई चे पूजन करण्यात आले. त्यानंतर दिंडी सोहळ्यास सुरुवात झाली , विद्यार्थ्यांनी भक्तिमय वातावरणामध्ये रिंगण सोहळा पार पडला . या कार्यक्रमासाठी कार्यशाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.

Spread the love

Related posts

पोटच्या गोळ्याला फेकुन पसार झाली आई, महिला पोलिस बनल्या दायी

admin@erp

भेकराईमाता विद्यालयात पालक मेळाव्याचे आयोजन…

admin@erp

थेऊर येथील चिंतामणीच्या मंदिरात भाविकांची अलोट गर्दी…

admin@erp