पुणेमहाराष्ट्रराजकीय

शिवसेना हा केवळ लोकाभिमुख पक्ष- संजय मोरे..

प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे

मांजरी ता.१०: सत्ता असो वा नसो शिवसेना हा सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी सातत्याने काम करत असलेला लोकाभिमुख पक्ष आहे” असे मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांनी व्यक्त केले.
शिवसैनिक संतोष ढोरे यांच्या माध्यमातून महादेवनगर मांजरी येथे प्रभाग क्रमांक 15 मांजरी बुद्रुक- केशवनगर – साडेसतरा नळी परिसरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी संजय मोरे यांच्यासह आयोजक संतोष ढोरे, महिला आघाडीच्या उपशहरसंघटिका व निवडणूक समन्वयक प्रा. विद्या होडे, वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता घुले, विभागप्रमुख दिलीप व्यवहारे, उपशहर संघटक सुरज मोराळे, काँग्रेस नेते बाळासाहेब विभुते, मनसे शाखाप्रमुख कुलदीप यादव, ज्येष्ठ शिवसैनिक अनुक्रमे अंबाजी रणदिवे, दादा तुपे, बालाजी पांचाळ, बंडू पडघमकर, उत्तम फडतरे, अण्णा ताम्हाणे, पंढरीनाथ ढोरे, उपविभाग प्रमुख संतोष होडे,विभाग समन्वयक गणेश घुले, प्रभागप्रमुख कुणाल मोरे, युवासेना सरचिटणीस किरण जाधव,उपविभाग अधिकारी विकास घुले, केशवनगर शाखाप्रमुख अमर देशमुख, ऍडव्होकेट राहुल बायस, विशाल वाडेकर, प्रवीण रणदिवे, गणेश मरळ, पिंटू ठाकूर आदी उपस्थित होते.
यावेळी जेष्ठ शिवसैनिकांसह ज्येष्ठ नागरिकांचाही सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

Spread the love

Related posts

माजी आदर्श सरपंच बापूसाहेब बबनराव काळे यांना “महाराष्ट्र कीर्ती पुरस्कार 2025”

admin@erp

राष्ट्रीय क्रिडा दिन आण्णासाहेब मगर महाविद्यालयात साजरा

admin@erp

गुरुपौर्णिमेनिमित्त रंगला ‘अनुग्रह ‘ कार्यक्रम

admin@erp