देशपुणेमहाराष्ट्र

शिक्रापूर शाखा लाला अर्बन बँकेचा अकरावा वर्धापन दिवस संपन्न…

प्रतिनिधी :- निलेश जगताप

शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील लाला अर्बन को ऑपरेटिव्ह बँक या शाखेचे 11 वी वर्धापन सोहळा अतिशय उत्साहात थाटामाटा मध्ये अनेक मान्यवरांच्या व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये वर्धापन दिन संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख उपस्थितीमध्ये युवराज शेठ बाणखेले, अध्यक्ष लाला अर्बन बँक जितेंद्र शेठ गुंजाळ, उपाध्यक्ष लाला अर्बन बँक ज्ञानेश्वर सुरम, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी युगराग उद्योग समूहाचे चेअरमन लोकनेते राहुल दादा करपे, माजी सरपंच संजय जगताप, अशोक भुजबळ संभाजी पतसंस्था संचालक, अनिल जगताप, उद्योजक रावसाहेब काळकुटे व तसेच बँकेचे कर्ज विभागाचे प्रमुख प्रमोद कांबळे व वसुली अधिकारी पठाडे साहेब व तसेच बँकेचे असंख्य खातेदार या वर्धापन दिनाच्या निमित्ताने उपस्थित होते.
यावेळेस खासदार स्वर्गीय किसनराव बाणखेले यांच्या प्रतिमेचे पूजन करून व प्रतिमेस पुष्प हार घालून वर्धापन दिवस संपन्न करण्यात आला.
यावेळेस लोकनेते राहुल दादा वर्धापन दिनाच्या निमित्ताने बोलताना म्हणाले की लाला अर्बन बँक ही अतिशय खातेदारांच्या विश्वास पात्र ठरलेली एकमेव बँक आहे व या बँकेचा कारभार अतिशय पारदर्शक चालत आहे व त्यांनी स्वर्गीय खासदार किसनराव बाणखेले यांच्या आठवणींना उजाळा दिला व सर्वात शेवटी पी डी करवंदे यांनी सर्वांचे आभार मानले.

Spread the love

Related posts

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात “संविधान निर्मिती” माहितीपटाचे सादरीकरण

admin@erp

लोहगाव येथील उपजिल्हा रुग्णालय लवकर सुरू करावे : बापूसाहेब पठारे

admin@erp

मांजरी खुर्द येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन

admin@erp