प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे
मांजरी ता.७: वाघोली ,वडजाई दत्तविहार येथील विनायक अडसूळ याची युवा सेना हवेली तालुका सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. युवा सेना पुणे जिल्हाध्यक्ष गणेश सातव यांच्या संमतीने तसेच युवा सेना हवेली तालुका अध्यक्ष विक्रम वाघमारे यांनी शिवसेनेच्या अधिकृत पत्राद्वारे नियुक्ती करत घोषणा केली.
नव्या जबाबदारीनंतर विनायक अडसूळ यांनी सांगितले की, “गणेश सातव व विक्रम वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटन अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून, सर्वसामान्यांसह युवकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार आहे.”
अडसूळ यांच्या निवडीमुळे हवेली तालुक्यातील युवा सेनेला नवी ऊर्जा व दिशा मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
