पुणेमहाराष्ट्रसामाजिक

युवा नेते राहुल दादा यांचा कामाचा धडाका 24 तासात दहिवडी उकले वस्ती ट्रान्सफर डीपी बसवण्यात यश.

प्रतिनिधी : – निलेश जगताप

शिरूर तालुक्यातील दहिवडी उकले वस्ती या ठिकाणी गेले अनेक दिवस विद्युत रोहित्र जळाल्यामुळे तेथील शेतकऱ्यांचे व विद्यार्थ्यांचे तसेच ग्रामस्थांचे लाईट नसल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. ही समस्या युवा नेते राहुल दादा करपे यांच्या लक्षात आल्यानंतर त्वरित त्यांनी रांजणगाव येथील विद्युत महावितरण केंद्रातील अधिकारी दीपक पाचुणकर यांच्याशी संपर्क करून तेथील परिस्थितीचा आढावा त्यांना सांगितला व 24 तासाच्या आत मध्ये तेथील परिसरामध्ये नवीन ट्रान्सफर डीपी बसवण्यात आली.

यावेळेस परिसरातील अनेक शेतकरी वर्ग ग्रामस्थ उपस्थित होते त्यामध्ये प्रामुख्याने वसंत उकले, संतोष उत्तम उकले. संतोष कैलास उकले. बाळासाहेब उकले, रोहिदास उकले, रामचंद्र उकले , संदीप उकले , संतोष उकले, सुभाष उकले राष्ट्रवादी शरदचंद्रजी गटाचे नेते राजाभाऊ जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळेस राहुल दादा म्हणाले की लाईट नसल्यामुळे शेतकरी बांधवांना शेतामध्ये पिकांना भरणी करण्यासाठी अडचण येत होती शेतकऱ्यांना गुरांसाठी चारा कुट्टी मशीनद्वारे देण्यास अडचण येत होती तसेच शाळकरी मुलांना अभ्यासासाठी अडचणीत होती हे लक्षात आल्यानंतर त्वरित पाठपुरावा करून ते काम तडीस नेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये विशेष करून दीपक पाचुणका साहेबांनी मोलाचे सहकार्य केले त्यांचे, त्यांनी आभार व्यक्त केले. व परिसरामध्ये शेतकरी बांधवांनी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Spread the love

Related posts

अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या हवेली तालुका अध्यक्ष पदी बापूसाहेब कंद तर उपाध्यक्षपदी सचिन उंद्रे

admin@erp

मांजरीत भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा..

admin@erp

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ४ सप्टेंबरनंतर जाहीर होण्याची शक्यता

admin@erp