शैक्षणिक

यश कुलकर्णीचा आझाद मंडळाकडून सत्कार…

प्रतिनिधी- भगवान खुर्पे

           भवानीनगर केंद्रात दहावी मध्ये प्रथम आल्याबद्दल यश कुलकर्णीचा आझाद तरुण मंडळातर्फे सत्कार.
           भवानीनगर : सणसर येथील राज्य शासन तसेच गणराया अवार्ड पुरस्कार प्राप्त आझाद तरुण मंडळाचे कार्यकर्ते केदार श्रीकांत कुलकर्णी यांचा मुलगा यश केदार कुलकर्णी हा नुकत्याच झालेल्या इयत्ता दहावी मध्ये भवानीनगर केंद्रामध्ये 96.40 टक्के गुण मिळवून प्रथम आला. या उत्तुंग यशाबद्दल यश व त्यांच्या पालकांचा आझाद तरुण मंडळाच्या वतीने श्री गणेशाची चांदीची मूर्ती देऊन व पुष्पगुच्छ मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व विशेष कार्यकारी अधिकारी प्रकाश शिंदे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
           याप्रसंगी श्रीकांत कुलकर्णी,रमेशदादा निंबाळकर, ह.भ.प.सुरेश महाराज ढगे,अनिल गुप्ते,अण्णासो रायते,मिलिंद गाडे,संजय शिंदे,अध्यक्ष स्वप्निल शिंदे, संजय शिंदे, आर्यन गुप्ते,गणेश जाधव,योगेश गाडे,अक्षय कांबळे,स्वानंद गाडे,आनंद गाडे,ओम गाडे, इत्यादी उपस्थित होते. विशेषतः सणसर (ता. इंदापूर) येथील आझाद तरुण मंडळाच्या वतीने वर्षभर विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात असल्याचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश शिंदे यांनी सांगितले.

Spread the love

Related posts

राजा शिवछत्रपती मतिमंद निवासी शाळेमध्ये वसंत नाईक जयंती उत्साहात संपन्न

admin@erp

मांजरी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत

admin@erp

शिक्रापूर शाळेतील १९ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

admin@erp