उत्सवपुणेमहाराष्ट्रसांस्कृतिक

मांजरीत अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न…

प्रतिनिधी : – अशोक आव्हाळे

मांजरी ता.१३: मांजरी खुर्द येथे श्री विठ्ठल रुक्मिणी प्रासादिक दिंडी मंडळ व समस्त ग्रामस्थांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. काल्याच्या कीर्तनामध्ये हभप ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी अनेक उदाहरणे व उपदेश करत भाविकांना मंत्रमुग्ध केले. यामध्ये बोलताना त्यांनी सांगितले की,जाती पातीचा भेदभाव न करता सर्वांनी एकत्र येऊन सर्व धर्म समभावाचा आदर करावा. गावच गावाच्या कामाला येतं, जातीयवादी लोकांपासून सावध राहा. तुमची आमची जात कोणतीही असो गावा गावात सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी भावाभावा सारखे प्रेमाने नांदले पाहिजे तरच गावचे गावपण टिकून राहते. या किर्तनानंतर काल्याची दहीहंडी फोडली.
मांजरी खुर्द येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मुर्ती प्रतिष्ठापना रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त २४ वा अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सप्ताहाला दोन तप झाले आहे. यामध्ये हभप राम महाराज सोमटकर यांनी सात दिवस व्यासपीठ चालवले. भाविक भक्त व ग्रामस्थ यांना परमार्थाविषयी आवड वृध्दिंगत व्हावी,संत संगती, ग्रंथ वाचन, श्रवण व नामचिंतन घडावे या हेतूने मांजरी खुर्द येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनामसप्ताह वर्ष २४ वे चे आयोजन येथे करण्यात आले होते. या सप्ताहात विविध नामांकित कीर्तनकारांची कीर्तनाची सेवा पार पडली. यामध्ये गुरुवार (ता.१३) रोजी सकाळी पहाटे काकड आरती, देवाच्या फुलांचा लिलाव व नंतर १० ते १२ हभप ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांची किर्तन सेवा पार पडली. येथील फुलांचा लिलाव दिंडी मंडळाचे अध्यक्ष दामोदर उंद्रे यांनी घेतला.
बुधवारी सायंकाळी ग्रंथदिंडीचे आयोजन करुन गावातून दिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली. ग्रामस्थांनी दिंडी मार्गावरती रांगोळीच्या पायघड्या घातल्या होत्या. यानंतर हरिपाठ करण्यात आला.यामध्ये महिलांनी फुगड्या खेळत या सोहळ्याचा आनंद द्विगुणीत केला. हरिपाठानंतर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण समाप्ती व दिपोत्सव साजरा करण्यात आला. रात्री हभप शेखर महाराज जांभुळकर यांचे किर्तन झाले. या सर्व कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यादरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रोहिदास उंद्रे, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन किशोर उंद्रे, दामोदर उंद्रे, गुलाब उंद्रे,वसंत सावंत, महादेव उंद्रे,तलाठी सुधीर जायभाय तसेच गावचे आजी माजी सरपंच उपसरपंच, सदस्य, श्री विठ्ठल रुक्मिणी प्रासादिक दिंडी मंडळाचे विश्वस्त व संचालक,अनेक मान्यवर पदाधिकारी, महिला व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

Spread the love

Related posts

भुजबळ विद्यालयात योग दिन साजरा.

admin@erp

स्थानिक स्वराज्य संस्था: निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट; कधी होणार निवडणूक?

admin@erp

दिगंबरा दिगंबराच्या जयघोषाने मांजरी कोलवडी परिसर दुमदुमला..

admin@erp