Uncategorizedपुणेराजकीय

महेश ढमढेरे यांची संस्थाचालक शिक्षण मंडळ,पुणे संचालकपदी बिनविरोध निवड..

प्रतिनिधी :- भगवान खुर्पे

तळेगाव ढमढेरे , दि. ३०,
तळेगाव ढमढेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळ आणि विद्या सहकारी बँकेचे विद्यमान संचालक, तसेच पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष महेश ढमढेरे यांची संस्थाचालक शिक्षण मंडळ पुणे जिल्ह्याच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाली आहे.
पुणे जिल्हा संस्थाचालक शिक्षण मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद ( श्री शाहू मंदिर महाविद्यालय ) पुणे येथे नुकतीच संपन्न झाली. त्यामध्ये महेश ढमढेरे यांची पुढील तीन वर्षांसाठी संचालकपदी एकमताने निवड करण्यात आली. यापूर्वीच्या पुणे जिल्हा संस्थाचालक शिक्षण मंडळाच्या कार्यकारिणी मध्ये त्यांनी सहसचिव म्हणून काम केलेले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन पुन्हा नव्याने महेश ढमढेरे यांना ही संधी मिळाली आहे.
महेश ढमढेरे यांच्या या नियुक्ती बद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, मानद सचिव अरविंद ढमढेरे, साहेबराव ढमढेरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन मुसमाडे, उपप्राचार्य डॉ. पराग चौधरी, रायकुमार गुजर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. अशोक दहिफळे,रेनबो इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्राचार्या श्रीमती सुनंदा लोले यांच्यासह सर्व संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले आहे.
पुणे जिल्हा संस्थाचालक शिक्षण मंडळाच्या या बैठकीमध्ये संस्थेचे अध्यक्ष विजयराव कोलते, ज्येष्ठ उपाध्यक्ष व नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाचे अनिल मेहेर, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीपदादा वळसे पाटील , आणि कळंब – वालचंद नगर येथील वीरसिंग रणशिंग , श्री खंडेराय शिक्षण प्रसारक मंडळाचे गणपतराव बालवडकर, अखिल भारतीय मराठा परिषद या संस्थेच्या सचिव सौ. प्रमिलाताई गायकवाड आदींसह पुणे जिल्ह्यातील विविध संस्थांचे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विलास पाटील यांनी कामकाज पाहिले.

Spread the love

Related posts

मांजरी खुर्द आणि परिसरात धुंवाधार पाऊस

admin@erp

तीनच्या प्रभागावर फुली, सोळा प्रभागांची रचना हालली!

admin@erp

योगेश काळुराम माझीरे यांचे निधन

admin@erp