महाराष्ट्रराजकीयसामाजिक

तळेगाव ढमढेरे उपसरपंचपदी मनोज आल्हाट बिनविरोध

प्रतिनीधी :- भगवान खुर्पे

तळेगाव ढमढेरे उपसरपंचपदी मनोज आल्हाट बिनविरोध

तळेगाव ढमढेरे दि.10 (वार्ताहर) तळेगाव ढमढेरेच्या उपसरपंच पदी विशाल उर्फ मनोज आल्हाट यांची बिनविरोध निवड झाली असून माजी उपसरपंच स्वाती लांडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर झालेल्या निवडणुकीत मनोज आल्हाट यांचा एकमेव अर्ज आल्याने आल्हाट यांची बिनविरोध निवड झाल्याचे अध्यक्ष सरपंच अंकिता भुजबळ यांनी सांगितले.
मागील उपसरपंच निवडीवेळी तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतने आमूलाग्र बदल करत उपसरपंचपदी स्वाती बाळासाहेब लांडे व विशाल उर्फ मनोज विलास आल्हाट या दोघांचीही उपसरपंच पदी निवड केली होती.

परंतु महाराष्ट्र व मुंबई ग्रामपंचायत अधिनियमला अनुसरून ही निवड नसल्याने स्वाती लांडे यांची एकच निवड वैध धरण्यात आली होती . त्यामुळे इतरांनाही संधी मिळावी म्हणून लांडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला व आल्हाट यांना संधी दिली. यावेळी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती अनिल भुजबळ, माजी सरपंच बाळासाहेब भुजबळ, तळेगाव ढमढेरे सोसायटीचे चेअरमन संतोष ढमढेरे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष रमेशराव भुजबळ , काँग्रेस नेते श्रीकांत सातपुते, महाराष्ट्र राज्य ओबीसी सेलचे अध्यक्ष बाळासाहेब लांडे, शिरूर तालुका आरपीआय अध्यक्ष नवनाथ कांबळे, संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष संदीप ढमढेरे, पोलीस पाटील पांडुरंग नरके उपस्थित होते. तर जय हनुमान पॅनलचे प्रमुख माजी सभापती अरविंद ढमढेरे यांनी आल्हाट यांना शुभेच्छा दिल्या .यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सरपंच अंकिता भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस यांनी कामकाज पाहिले. शासन दरबारी कामांचा पाठपुरावा करून गावच्या सर्वांगीण विकासासाठी कामे करणार असल्याचे नवनिर्वाचित उपसरपंच विशाल उर्फ मनोज आल्हाट यांनी निवडीनंतर सांगितले.

Spread the love

Related posts

मांजरीत भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा..

admin@erp

डॉ.चंद्रकांत केदारी यांसकडुन गुजर प्रशालेत शैक्षणिक साहित्य वाटप..

admin@erp

गुरुपौर्णिमेनिमित्त रंगला ‘अनुग्रह ‘ कार्यक्रम

admin@erp