पुणेमहाराष्ट्रशैक्षणिक

भुजबळ विद्यालयाच्या वतीने क्रांती दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन..

प्रतिनिधी :- भगवान खुर्पे

तळेगाव ढमढेरे तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील समाज भूषण संभाजीराव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने क्रांती दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून शहीद विष्णू गणेश पिंगळे यांच्या स्मारकास अभिवादन केले. तसेच याप्रसंगी शहीद विष्णू, गणेश पिंगळे यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे प्राचार्य श्री बाळासाहेब चव्हाण सर तसेच क्रीडाशिक्षक झुरुंगे सर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते, तसेच विद्यार्थ्यांना प्राचार्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे हर घर तिरंगा या मोहिमेचेही स्वागत करून घरोघरी तिरंगा फडकविण्यात आला. या उपक्रमाचे ज्ञानदीप ग्राम विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री शिवाजीराव भुजबळ साहेब व अध्यक्षा मंगलताई भुजबळ यांनी कौतुक केले.

Spread the love

Related posts

यूरो कॅम्पस शिक्रापूर येथे एकादशी महोत्सव — शिक्षण, संस्कृती आणि भक्ती यांचा अद्वितीय संगम

admin@erp

कमलबाई उंद्रे यांचे निधन..

admin@erp

पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार अजित पवारांची मोठी घोषणा..

admin@erp