आयुर्वेदिकआरोग्य

ब्राम्ही औषधी वनस्पतीचे फायदे…

प्रतिनिधी :- नूतन पाटोळे

ब्राह्मी किंवा बाकोपा मोन्नीइरी ही औषधी वनस्पती म्हणूनदेखील ओळखली जाते. पारंपरिक आयुर्वेदात या औषधी वनस्पतीला खूप महत्त्व आहे.

1. स्मृतीला चालना देते –
स्मृतीत वाढ करण्यामध्ये ब्राम्ही वनस्पती खुप प्रभावी ठरते. तसेच एखादी गोष्ट शिकण्याच्या क्षमतांना ब्राह्मी चालना देते, असे विविध अभ्यासातून दिसून आले आहे. शिवाय ब्राम्ही मेंदूच्या विविध मानसिक आजारांमध्ये सुधारणा करते. तसेच एकाग्रता वाढवण्यास मदत करते.

2. अल्झायमरवर उपयुक्त –
पार्किन्सन आणि अल्झायमर यांसारख्या काही न्यूरोलॉजिकल समस्या; एखाद्या व्यक्तीच्या स्मृती भ्रंश होण्याशी संबंधित असतात. अशा व्यक्तींची स्मृती वाढवण्यामध्ये आणि मेंदूच्या पेशी पुन्हा निर्माण करण्यामध्ये ब्राम्ही मदत करते. ही वनस्पती अल्झायमर सारख्या न्यूरोलॉजिकल समस्यांसाठी खुप उपयुक्त आहे.

3. मानसिक ताण कमी –
ब्राह्मीचे सेवन केल्याने मानसिक तणावही कमी होण्यास मदत होते. ब्राह्मीचा शीतल प्रभाव असतो ज्यामुळे हार्मोन्स संतुलित होते आणि तणाव कमी करण्यास मदत होते. ब्राह्मीमध्ये कोर्टिसोलची पातळी कमी करण्याचा गुणधर्म देखील आहे. त्याला स्ट्रेस हार्मोन असे म्हणतात. ब्राह्मी तेलाने डोक्याला मसाज केल्याने तणाव कमी होतो.

4. झोपेचे विकार –
जेव्हा मनामध्ये बऱ्याच विचारांची सरमिसळ चालू असते, अशावेळी शांत झोप घेणे फार कठीण जाऊ शकते. मग संपूर्ण दिवस कंटाळवाणा गेला असला तरी शांत झोप घेणे अवघड असते. अशावेळी ब्राह्मी मनाला शांत करुन दर्जेदार झोप घेण्यास मदत करते.

5. मधुमेह –
ब्राह्मी वनस्पतीचा वापर मधुमेह विरोधी औषध म्हणून केला जाऊ शकतो. कारण ब्राह्मी वनस्पती रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते, ज्यामुळे आपसूकच मधुमेहावरही नियंत्रण राहते.

6. अँटीऑक्सिडंट –
ब्राह्मीमध्ये अँटीऑक्सिडेटिव्ह गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीरातील मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण होते. अशा मुक्त रॅडिकल्समुळे पेशींचे नुकसान होत असते. हे मुक्त रॅडिकल्स हृदयरोग आणि विशिष्ट प्रकारचे कर्करोग अशा गंभीर आजारांसाठी कारणीभूत ठरतात. म्हणूनच, ब्राह्मी ही एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट म्हणून महत्त्वाचे कार्य करते.

7. संधिवात –
ब्राह्मी ही भाजी संधिवात आणि जळजळ कमी करण्यासाठी मदत करते. ज्यांना गॅस्ट्रिकचा आणि अल्सरच्या त्रास आहे. अशांनी आपल्या दररोजच्या आहारामध्ये ब्राह्मीचा समावेश करावा. जर आपल्याला दररोज ही भाजी बनवून खाणे शक्य नसेल तर आपण भाजी स्वच्छ धुवून त्यामध्ये थोडेसे तूप टाकूनही खाऊ शकतो. यामुळे भाजीचा कडूपणा कमी होण्यास मदत होते.

8. रोगप्रतिकारक शक्ती –
ब्राह्मीच्या भाजीमध्ये रोगाशी लढण्याचे गुणधर्म भरपूर आहेत. त्यामुळे ही ब्राह्मी भाजी रोज खाल्ल्याने शरीरातील शक्ती वाढते. ब्राह्मी भाजीचा रस खूप चांगला आहे. ब्राह्मीची भाजी विविध पोषक तत्वांनी समृद्ध असतात. त्यामुळे दररोज एक जेवढा शक्य आहे, तेवढा ब्राह्मीच्या भाजीच ज्यूस प्या.

9. कर्करोग –
ब्राह्मीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. जे शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते. हे अँटिऑक्सिडंट पेशींमधून हानिकारक दूषित पदार्थ बाहेर टाकतात. यामुळेच कर्करोगाचा धोका खूप कमी होतो. तसेच ज्यांना कर्करोग झाला आहे, अशांनी देखील या भाजीचा आपल्या आहारामध्ये समावेश करायला हवा.

10.वजन कमी करण्यास मदत –
ब्राह्मीच्या भाजीमधील काही गुणधर्म वाढलेले वजन कमी करण्यासही मदत करते. यामुळे तुम्ही आहारामध्ये ब्राह्मीच्या भाजीचा समावेश करा. तसेच जर दररोज सकाळी ब्राह्मीच्या भाजीचा ज्यूस पिलातर वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. आपण सलाडमध्ये देखील ब्राह्मीच्या भाजीचा समावेश करायला हवा.

Spread the love

Related posts

ब्रोकोली खाण्याचे फायदे…

admin@erp

मध आणि मनुका सोबत खाल्ल्याने होतात हे फायदे …

admin@erp

हिंगाचे पाणी फायदेशीर..

admin@erp