पुणेमहाराष्ट्र

बँकेचे शटर तोडून प्रवेशही केला मात्र रिकाम्या हाताने परतले.

चोरट्यांना कॅनरा बँकेचे लॉकर उघडता आले नाही यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

प्रतिनिधी : – आशोक आव्हाळे

मांजरी ता.१३ : मांजरी खुर्द (ता.हवेली) येथे रविवार .१३ जुलै रोजी रात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास रिक्षातून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी येथील कॅनरा बँकेच्या शटरची तिन्ही कुलपे तोडुन शटर उचकटून चोरट्यांनी बँकेत प्रवेश केला.बँक फोडून लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. चोरट्यांना कॅनरा बँकेचे लॉकर उघडता आले नाही यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
चोरट्यांनी तोंडाला काळे रुमाल बांधले होते. यावेळी येथे असणारी तिजोरी फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला परंतु त्यांना ती तिजोरी फोडता आली नाही. तसेच येथील कॅशियरचा ड्रॉवर उचकटून त्यामध्ये काही पैसे मिळतील का या अशाने चोरी करण्याचा प्रयत्न केला असता त्यामध्ये काही आढळले नाही. या चोरांना काही हाताला लागले नसल्याने रिकामी हाताने माघारी जावे लागले. ही घटना बँकेच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाली आहे. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरांचा चोरी करण्याचा प्रयत्न फसला. शटर तोडतानाचा आवाज आल्याने स्थानिक ग्रामस्थ येथे उपस्थित झाले होते. उपस्थित नागरिकांनी आपत्कालीन ११२ या नंबर वर पोलिसांशी संपर्क साधल्या नंतर अर्ध्या ते पाऊण तासाने पुणे शहर व वाघोली पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी येथे दाखल झाले. पोलिसांनी बँकेचा परिसर व बँकेच्या आतील बाजूची संपूर्ण पाहणी केली.चोरट्यांनी बँकेचा आलाराम व बाहेरी सीसीटीव्ही कॅमेरा तोडुन बँकेत प्रवेश केला परंतु आतील कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले आहेत. चोरीचा प्रयत्न फसल्याने चोरटे पुन्हा रिक्षात बसून पसार झाले. दरम्यानच्या काळात एकमेकांना फोन करत या ठिकाणी स्थानिक नागरिक जमा झाले होते. त्याचवेळी पुन्हा एका रिक्षात तीन इसम आले आणि त्यांनी नागरिकांच्या अंगावर रिक्षा घालण्याचा प्रयत्न केला.
सीसीटीव्हीचे फुटेज मिळाल्याने पुढील तपास पुणे शहर पोलीस करत आहेत.

Spread the love

Related posts

निमगाव म्हाळुंगी येथे सामुदायिक गंगापूजन ‌

admin@erp

मांजरी खुर्द व परिसरात बेकायदा होर्डिंगचा सुळसुळाट

admin@erp

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ४ सप्टेंबरनंतर जाहीर होण्याची शक्यता

admin@erp