पुणेमहाराष्ट्र

बँक ऑफ बडोदा आरसेटी या संस्थे मार्फत शिक्रापूर येथे ग्रामीण महिलांसाठी मोफत १४ दिवसांचे पेहराव व दागिने बनविण्याचे प्रशिक्षण यशस्वीपणे पार पडले..

प्रतिनिधी :- निलेश जगताप

ग्रामीण भागातील महिलांना आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने, १४ दिवसांचे मोफत पेहराव व दागिने बनविण्याचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये विविध गावांमधून आलेल्या महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

प्रशिक्षणाच्या कालावधीत महिलांना पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचे प्रकार, पेहराव डिझाईनिंग, रंगसंगती, साहित्य निवड, आणि बाजारपेठेतील मागणी यासंबंधी सखोल मार्गदर्शन विद्या भोसले मॅडम यांनी केले .अनुभवसंपन्न प्रशिक्षकांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह महिलांना दैनंदिन वापरासाठी आणि विक्रीसाठी योग्य अशा वस्तू तयार करायला शिकवले.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश महिलांना घरी बसून उद्योग सुरू करता यावा, स्वावलंबी होता यावे, आणि कुटुंबाच्या उत्पन्नात हातभार लावता यावा, हा होता. काही महिलांनी आपल्या तयार केलेल्या वस्तूंची विक्री सुरुही केली आहे.

तसेच प्रशिक्षक समन्वयाची जबाबदारी श्री विवेक जाधव सरांनी उत्तम सांभाळली आणि महिलाना बँकेच्या विविध योजना समजाऊन सांगितल्या यांच्यावतीने लवकरच अशा आणखी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, जेणेकरून ग्रामीण महिलांना कौशल्याच्या माध्यमातून सक्षम करता येईल.

Spread the love

Related posts

तळेगाव ढमढेरे उपसरपंचपदी मनोज आल्हाट बिनविरोध

admin@erp

व्यवसाय असोसिएशन शिक्रापूर यांच्या वतीने वाहतूक कोंडी सोडवण्यास मदत

admin@erp

तळेगाव ढमढेरे सरपंचपदी स्वाती लांडे बिनविरोध

admin@erp