पुणेमहाराष्ट्र

प्रितम राऊत यांना सावित्रीबाई फुले शैक्षणिक पुरस्कार…

प्रतिनिधी :- निलेश जगताप

शिक्रापूर.
येथील आदर्श ग्रामपंचायत सदस्या सौ. शालनताई अनिल राऊत यांचे चिरंजीव कु. प्रितम राऊत यांनी विविध सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांना नुकतेच सावित्रीबाई फुले शैक्षणिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ज्ञानज्योती कौतुक सन्मान सोहळा संमेलनामध्ये मल्टिपर्पज फाऊंडेशन अहिल्यानगर व बहुउद्देशीय सामाजिक संस्था पुणे यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
यावेळी मा. श्री. पितांबर काळे (ज्येष्ठ दिग्दर्शक), मा. ममताताई सिंधूताई सपकाळ,वालचंदनगर पोलीस उपनिरीक्षक मा. रतिलाल चौधर, श्री. नवनाथ मोडक, अंकुश घारे, मयूर राऊत,नीतीन ताठे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुरस्काराविषयी बोलताना प्रितम राऊत यांनी सांगितले की हा पुरस्कार मला भेटलेला नसून तो माझ्या आई वडिलांनी माझ्यावर केलेल्या संस्काराला आणि कष्टाला मिळालेला आहे. पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल्याने त्यांचे जिल्ह्यातून कौतुक होत आहे.

Spread the love

Related posts

तळेगाव ढमढेरे येथे पारंपारिक पोत सोहळा संपन्न..

admin@erp

श्री गजानन महाराज 115 वी पुण्यतिथी कार्यक्रम शिक्रापूर मध्ये संपन्न…

admin@erp

वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करा: वाहीद पठाण…

admin@erp