प्रतिनिधी : – निलेश जगताप
शिक्रापूर ता. शनिवार दिनांक २८ जून रोजी विद्याधाम प्रशाला, शिक्रापूर येथे प्राचार्य श्री.सोनबापू तुकाराम गद्रे सर व कला अध्यापक श्री.विलास नामदेव कांबळे सर यांचा सेवा पूर्ती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. बत्तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर दोघेही सेवानिवृत्त झाले.श्री.गद्रे सर यांनी डिसेंबर १९९३ श्री. वाघेश्वर विद्याधाम प्रशाला मांडवगण फराटा येथून आपल्या अध्यापन सेवेला प्रारंभ केला.जून २०१२ मध्ये त्यांना विद्याधाम प्रशाला शिक्रापूर येथे उपमुख्याध्यापक म्हणून व जून २०१५ पासून मुख्याध्यापक म्हणून संस्थेने पदोन्नती दिली.जून २०१८ ला त्यांची मांडवगण फराटा येथे मुख्याध्यापक म्हणून बदली करण्यात आली. जून २०२२ पासून आजपर्यंत त्यांनी विद्याधाम प्रशाला शिक्रापूर येथे अतिशय उत्तम पध्दतीने कामकाज पाहिले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाला समिती चे चेअरमन श्री.शिरीषशेठ बरमेचा हे होते.तर शिरुर शिक्षण प्रसारक मंडळ घोडनदी चे सचिव श्री.नंदकुमार श्रीरंगराव निकम यांच्या शुभहस्ते शिक्रापूर ग्रामपंचायत व प्रशालेच्या वतीने सेवा निवृत्तांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमामध्ये मा.जि.प. सदस्या सौ.रेखाताई मंगलदास बांदल,सौ.कुसुमताई आबाराजे मांढरे,मा. आदर्श सरपंच पै.श्री.रामभाऊ सासवडे, विद्यमान सरपंच श्री.रमेश गडदे.श्री.राजाभाऊ मांढरे ,उपसरपंच सौ.वंदना रमेशशेठ भुजबळ,मा.उपसरपंच सुभाषमामा खैरे,मा.उपरपसरपंच श्री.नवनाथ सासवडे,मा.उपसरपंच सौ.सारीकाताई उत्तम सासवडे,संस्थेचे विश्वस्त श्री.प्रकाशशेठ बोरा व प्रकाश शेठ बाफना, यांनी सेवा निवृत्तांना शुभेच्छा दिल्या.
प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने सौ.रंभा विराट मॅडम व प्रा.नानासाहेब गावडे सर यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते , या मध्ये श्री.मंगेश शेंडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,सचिन सासवडे,समता परिषद पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री.सोमनाथ भुजबळ, उद्योजक श्री.रमेशशेठ भुजबळ, श्री.अंकुश घारे,भाजप जेष्ठ नेते श्री.बाळासाहेब चव्हाण, सुरेश खुरपे, चंद्रकला मांढरे,इ.मान्यवर उपस्थित होते.त्याच प्रमाणे कर्तव्य फाउंडेशन, आधार फाउंडेशन या सामाजिक संस्थांनी तसेच श्री.गद्रे सर व श्री.कांबळे सर यांचे स्नेही व नातेवाईक व ग्रामस्थ यांच्या वतीने वैयक्तिक सुध्दा सन्मान करण्यात आले.या कार्यक्रमाच्या निमित्ताने सेवा निवृत्तांच्या वतीने सर्व मान्यवरांना,पैपाहुण्यांना तसेच प्रशालेतील विद्यार्थ्यांना व अध्यापकांना सुरुची भोजनाची मेजवानी देण्यात आली.भोजन व्यवस्था जेष्ठ अध्यापक श्री गणेश मांढरे सर यांनी पाहिली.या कार्यक्रमाचे नियोजन उपप्राचार्य श्री.सुरेश गंगावणे सर व पर्यवेक्षक श्री.पी.जे.मेरगळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.माने सर ,दिवटे सर,घोडे सर ,सौ.दिपाली गावडे मॅडम,श्री.सुभाष कुरंदळे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.श्री.माउली कुंभार सर यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचलन केले तर प्रा.रोहीणी अभिजित नरके यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.