Uncategorizedपुणेमहाराष्ट्रराजकीय

पुण्यात प्रभाग रचना बदलली जाणार, कशी असणार नवीन रचना? आज येणार महत्त्वाची अपडेट.

प्रतिनिधी : – अशोक आव्हाळे

पुणे ता.४ : तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने मोकळा झाला आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पुढील चार महिन्यांत निवडणुका घेण्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून प्रभाग रचनेच्या तयारीला सुरुवात झाली आहे. पुणे महापालिकेसह राज्यातील आणखीन नऊ महापालिकांमध्ये नव्याने चार सदस्यांची प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. लवकरच यासंबंधीचे आदेश जाहीर होणार आहेत.पुणे महापालिकेची प्रभाग रचना बदलली जाणार असली, तरी पिंपरी चिंचवडसह १७ महापालिकांची प्रभाग रचना २०१७ प्रमाणे कायम ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलेली चार आठवड्यांची मुदत मंळवारी संपली. यानुसार प्रभाग रचनेचा कार्यक्रम राज्य शासनाने निश्चित केला असून त्यासंबधीचे आदेश आज जाहीर होणार होण्याची शक्यता आहे.२०१७ च्या पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी एकूण ४१ प्रभाग तयार करण्यात आले होते. पहिल्यांदाच चार सदस्यांचा एक प्रभाग ही पद्धत राबवत १६२ सदस्य संख्या करण्यात आली होती.

पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांमुळे यंदाही सदस्य संख्या वाढणार आहे. आता २०१७ प्रमाणे प्रभागांची मोडतोड होणार की सत्ताधाऱ्यांकडून आपल्या सोयीची रचना करण्यासाठी वजन वापरले जाणार? हे पाहणे महत्वाचे आहे.अशी झाली होती २०१७ ची निवडणूक२०१७ साली भाजपने पहिल्यांदाच एक हाती सत्ता मिळवत तब्बल ९८ जागांवर विजय मिळवला होता, तर राष्ट्रवादी काँग्रेस ४०, शिवसेना १०, काँग्रेस १०, मनसे २, इतर तीन उमेदवार विजयी झाले होते.

Spread the love

Related posts

क्रांतिकारक विष्णू गणेश पिंगळे यांचे कार्य प्रेरणादायी- डॉ मुसमाडे

admin@erp

संत निरंकारी मिशनद्वारे रक्तदान शिबिर संपन्न..

admin@erp

admin@erp