देशपुणेमहाराष्ट्रराजकीयसंपादकीय

पुणे जिल्हा भाजपाच्या उपाध्यक्षपदी प्रदिप सातव…

प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे

मांजरी ता.२७ :भारतीय जनता पार्टीच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी वाघोली येथील प्रदीप शिवाजी सातव यांची निवड करण्यात आली आहे.पक्ष संघटनेत त्यांनी घेतलेली सक्रिय भूमिका, सामाजिक कार्य तसेच जन सामान्यांशी असलेली नाळ या पार्श्वभूमीवर त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. सातव यांच्या निवडीमुळे वाघोली व परिसरातील कार्यकर्त्यां मध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.
पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये सातत्याने सहभाग घेऊन संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी मोलाचे काम केले आहे. याची दखल घेऊन पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा उपाध्यक्ष या पदाची जबाबदारी मिळाल्याबद्दल प्रदीप सातव यांनी राज्याचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद या नेतृत्वाचे आभार मानले असून,पक्षविस्तार आणि जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सातव यांनी सांगितले. स्थानिक पातळीवर सामाजिक बांधिलकीतून त्यांनी घेतलेली भूमिका आगामी काळात पक्ष संघटनेला निश्चितच बळकटी येईल,असा विश्वास भाजपा कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

Spread the love

Related posts

भेकराईमाता विद्यालयात पालक मेळाव्याचे आयोजन…

admin@erp

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संजय उंद्रे तर उपाध्यक्षपदी नंदकुमार शेवाळे…

admin@erp

मांजरी, वाघोलीत ढोल ताशांच्या तालावर सर्जा राजाच्या मिरवणुका..

admin@erp