उत्सवपुणेमहाराष्ट्रशैक्षणिक

पावसाच्या वर्षावात ‘स्वातंत्र्यदिन’ सोहळा उत्साहात संपन्न…

फुरसुंगी : – भारताच्या ७९व्या स्वातंत्र्यदिनी श्री भेकराईमाता प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात ‘स्वातंत्र्यदिन सोहळा’ संपन्न झाला. श्री शंभू महादेव देवस्थान ट्रस्टचे ट्रस्टी मा. श्री विजय जगन्नाथ हरपळे, श्री सुधीर चंद्रकांत पवार, भारतीय सेनेतील जवान श्री संतोष हिले, इयत्ता दहावीच्या परीक्षेत विद्यालयातून प्रथम आलेली विद्यार्थीनी कु. तन्वी घाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयातील स्काऊट – गाईड च्या पथकाकडून नेत्रदीपक मानवदंना देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध सामुहिक कवायत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या सोहळ्यात इयत्ता १० वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन गुणगौरव करण्यात आला.

याप्रसंगी मा. नगरसेवक गणेश ढोरे, मा. ग्रा. पं. सदस्य अविनाश घुले, इ. एक्स. एल. कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट किशोर जाधव, उद्योजक कैलास हरपळे, सागर काळाणे, हनुमंत हरपळे, दत्तात्रय राऊत, शिवनंदन शितोळे, दत्ता हरपळे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. शुभश्री शिंदे, सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, सेवक, विद्यार्थी, ग्रामस्थ, पालक, माजी विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. श्री सुनील कामठे यांनी उपस्थितांचे स्वागत करून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. उपमुख्याध्यापक श्री सुनील दीक्षित, पर्यवेक्षक यास्मिन इनामदार, श्री मारुती खेडकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री राहुल घोंगडे, व्होकेशनल विभाग प्रमुख सौ. राजश्री हरपळे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. पावसाची संतत धार चालू होती, तरी सर्व विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या शिस्तीचे दर्शन घडवत कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाचा वाटा उचलला. प्रवीण भोसले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Spread the love

Related posts

बांधकाम विभागाने घेतली बातमीची दखल..

admin@erp

भुजबळ विद्यालयात योग दिन साजरा.

admin@erp

श्री पांडुरंग विद्या मंदिर, विठ्ठलवाडी येथे गुरुपौर्णिमा साजरी.

admin@erp