आयुर्वेदिकआरोग्य

दुधात मध मिसळून पिण्याचे फायदे…

प्रतिनिधी :- नूतन पाटोळे

मध आणि दूध हे शरीरासाठी गुणकारी मानले जाते. मधामध्ये अँटीबॅक्टेरियस, अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीफंगल हे गुण असतात. तसेच दुधामध्ये व्हिटामिन ए, बी,सी,डी, कॅल्शियम, प्रोटीन आणि लॅक्टिक अॅसिड ही पोषकतत्वे असतात.

मध आणि दूध एकत्र प्यायल्याने रोगप्रतिकार क्षमता वाढते. तसेच त्वचा चमकदार होते. दूध आणि मध एकत्र मिसळून त्वचेवर लावल्यास त्वचा चमकदार होते.गरम दुधात मध मिसळून प्यायल्याने तणाव दूर होण्यास मदत होते.

चांगली झोप येण्यासाठी दुधात मध मिसळून प्या. झोपण्याआधी एक तास गरम दुधात मध मिसळून प्यायल्यास फायदा होतो.

दररोज एक ग्लास दुधात दोन चमचे मध टाकून प्यायल्यास पाचनशक्ती सुधारण्यास मदत होते.

दूध आणि मधाच्या मिश्रणाने आपले शरीर तर हेल्दी होतेच त्यासोबतच हाडेही मजबूत होतात.

गरम दुधात मध मिसळून प्यायल्याने श्वसनासंबंधीच्या समस्या दूर होतात.

Spread the love

Related posts

चेरीचे आरोग्यदायी फायदे…

admin@erp

पालक खाण्याचे फायदे…

admin@erp

कच्ची पपई खाण्याचे फायदे…

admin@erp