पुणे

दिगंबरा दिगंबराच्या जयघोषाने मांजरी कोलवडी परिसर दुमदुमला..

प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे

मांजरी दि.५ :दत्त माझी माता दत्त माझा पिता ।
बहिणी बंधु चुलता दत्त माझा ॥
परमार्थामध्ये एक निष्ठता महत्त्वाची आहे. दत्तात्रयाची पूजा करताना तुम्ही दत्तात्रयाचे भक्त आहात ना तुम्ही तर मग माझं असं म्हणणं आहे दत्तात्रयचे जर भक्त असाल दत्तात्रयाची जर पूजा करत असाल तर पांडुरंगाच्या दर्शनाला जरी पंढरपूरला गेले तर त्या पांडुरंगा मध्ये सुद्धा तुम्हाला माझे दत्तात्रय भगवान दिसले पाहिजे असे आपल्या किर्तन सेवेतुन हभप पुरूषोत्तम महाराज पाटील यांनी सांगितले.
“दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” च्या अखंड जयघोषात मांजरी खुर्द व कोलवडी परिसरातील दत्त मंदिरामध्ये गुरूवार (ता.५) रोजी मोठ्या आनंदाच्या व उत्साहाच्या वातावरणामध्ये श्रीदत्त जन्म सोहळा पार पडला. यावेळी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान भाविकांनी मोठ्या रांगा लावून दर्शन घेतले. यादरम्यान वडगावशेरी मतदार संघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी गावातील श्रीदत्त मंदिरात भेट दिली. यावेळी त्यांचा सन्मान करण्यात आला.
मांजरीत हभप रामभाऊ नेवाळे महाराज, किशोर उंद्रे ,लक्ष्मण नेवाळे, बाळासाहेब नेवाळे, बाबुराव नेवाळे, अशोक आव्हाळे, नवनाथ नेवाळे आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये सात दिवस गुरूचरित्र पारायण, महाअभिषेक, होम हवन, भजन कीर्तन प्रवचन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी परिसरातील हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते. दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट करून मंदिरावरती भव्य विद्युत रोषणाई केली होती. येथे ह.भ.प. जगदीश महाराज उंद्रे यांची किर्तन सेवा तर ह.भ.प. सोमनाथ माने महाराज यांचे प्रवचन झाले. यानंतर पाळणा होऊन महाप्रसादाचे वाटप केले गेले.
तसेच माळवाडी ढोम वस्ती येथे नवीन मंदिर बांधण्यात आले असून यामध्ये श्रीदत्तांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. येथे रविंद्र उंद्रे, माजी सरपंच रुपेश उंद्रे, आशिष उंद्रे, दादा उंद्रे, दिपक उंद्रे आदींनी नियोजन केले होते.
कोलवडीत श्रीदत्त विहार येथे यशवंत सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष किशोर उंद्रे, साई गणेश पतसंस्थेचे अध्यक्ष संतोष आप्पा मुरकुटे, सुभाष लांडगे, जीवन उंद्रे, सुषमा मुरकुटे, उद्योजक विकास गायकवाड यांनी आयोजन केले होते.यावेळी सकाळी ह.भ.प. पुरषोत्तम महाराज पाटील यांची किर्तन सेवा संपन्न झाली. मंदिरात विद्युत रोषणाई व रांगोळीच्या पायघड्या घातल्या होत्या. कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन केले होते. तसेच श्री आंगण कॉलनी येथे दत्तात्रय म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली श्री दत्त जयंती सोहळा साजरा झाला.
भाविकांच्या उपस्थितीत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात, फुलांची उधळण करत दत्त जन्माचा सोहळा साजरा केला.
यादरम्यान ज्ञानलीला वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगाची तर ह भ प नामदेव महाराज बापमारे यांनी गायनाची साथ दिली.
परिसरातील भाविक भक्तांनी व महिलांनी मोठ्या उत्साहाने येथील दत्त जयंती सोहळ्यात सामील होऊन या कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केला.या कार्यक्रमा वेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन अशोक आव्हाळे, हनुमंत नेवाळे यांनी केले.

Spread the love

Related posts

महाराष्ट्र राज्य सैनिक फेडरेशन च्या अध्यक्षपदी सैनिक नेते शिवाजी अण्णा यांची बिनविरोध निवड..

admin@erp

नागपंचमी निमित्त विद्यार्थ्यांमध्ये सापांविषयीची जनजागृती..

admin@erp

निवडणुक आरक्षण सोडत जाहीर, प्रभाग १५ मध्ये दोन पुरुष, दोन महिला होणार नगरसेवक…

admin@erp