उत्सवपुणेमहाराष्ट्र

थेऊर येथील चिंतामणीच्या मंदिरात भाविकांची अलोट गर्दी…

२१ वर्षांनी अंगारकी चतुर्थीचा दुर्मिळ योग..

प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे

मांजरी ता.१२: थेऊर (ता. हवेली ) येथील अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री चिंतामणीच्या दर्शनासाठी मंगळवार (दि.१२) रोजी भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. साधारण २१ वर्षानंतर श्रावण महिन्यात अंगारकी चतुर्थी येण्याचा योग आल्याने भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पहाटेच्या सुमारास श्री चिंतामणीचे पुजारी अजय आगलावे यांनी श्रींची महापूजा केली. त्यानंतर चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने ही पूजा करण्यात आली. मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. भाविकांना दर्शन व्यवस्थित व्हावे यासाठी मंदिराच्या पटांगणामध्ये मंडप टाकण्यात आला होता.

या ठिकाणी भाविकांच्या दर्शन बारीसह पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. अंगारकी चतुर्थी निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. चिंचवड देवस्थान ट्रस्ट व तर्पण ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने हे शिबिर आयोजित केले होते. भाविकांनी या शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान केले. या ठिकाणी फराळाचे वाटप करण्यात आले. ह.भ.प. उगले महाराज आळंदी देवाची यांची किर्तन सेवा पार पडली. रात्री चंद्रोदयानंतर श्रींची छबीना मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

Spread the love

Related posts

निमगाव म्हाळुंगी येथे सामुदायिक गंगापूजन ‌

admin@erp

गुजर प्रशालेत पालखी सोहळा उत्साहात संपन्न..

admin@erp

शहर सुरक्षित आणि अतिक्रमणमुक्त करणे ही पी एम आर डी ए ची प्राथमिकता : आयुक्त डॉ. म्हसे

admin@erp