प्रतिनिधी : – नूतन पाटोळे
टोमॅटोमध्ये पाणी आणि फायबरची मात्रा जास्त असते. त्यामुळे पोट लवकर भरतं आणि फॅट्सही वाढत नाहीत. तुम्ही टोमॅटोचं सेवन ज्यूस, सूप, सॅलड कोणत्याही प्रकारे करू शकता.
1- जर तुम्हाला लो किंवा बैचेन वाटत असेल तर टोमॅटो ज्यूस प्या. कारण टोमॅटोचा ज्यूस शरीराला उर्जा देतो.
2- टोमॅटोचं सेवन हाय बीपीने त्रस्त असलेल्या लोकांसाठीही फायदेशीर आहे. कारण टोमॅटोमध्ये पॉटेशिअम भरपूर प्रमाणात आढळतं. त्यामुळे टोमॅटोचा एक कप ज्यूसही फायदेशीर आहे. हृदयरोगांमध्येही टोमॅटो ज्यूसचं सेवन गुणकारी असतं. पण हा ज्यूस घेण्याआधी एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
3- टोमॅटोचा ज्यूस फक्त मोठ्यांनाच नाहीतर लहानग्यांसाठीही फायदेशीर आहे. मुलांच्या मानसिक आणि शारीरिक विकासात यामुळे मदत होते. याशिवाय मुलांच्या पोटात जंत झाल्यास सकाळी रिकाम्या पोटी टोमॅटो ज्यूसमध्ये काळीमिरी घालून दिल्यास फायदा होतो.
4- टोमॅटोमध्ये व्हिटॅमीन ए आणि सी आढळतं, जे डोळ्यांची नजर वाढवण्यास मदत करतं. याशिवाय टोमॅटोमुळे डोळ्यांना होणारा रांताधळेपणाही कमी होतो. टोमॅटो मोतीबिंदूची वाढही रोखतो.