प्रतिनिधी :- नूतन पाटोळे
१) पचनशक्ती सुधारते :–
शरीरातील पचनशक्ती जर व्यवस्थित रित्या काम करत नसेल, तर लठ्ठपणा वाढतो. त्यामुळे शरीरातील पचनशक्ती किंवा पचनक्रिया सुधारवणे आपल्या हातात आहे. त्यामुळे लठ्ठपणा नाहीसा होऊ शकतो.
जर्दाळू एक असं फळ आहे की ज्यात इतर फळांच्या तुलनेत फायबर मोठ्या प्रमाणात असते. नियमित जर्दाळू खाल्ल्याने आपली पचनशक्ती चांगली होते आणि पोटाच्या सर्व समस्या दूर होतात आणि त्यामुळे वजन आटोक्यात राहते.
२) त्वचेसाठी उपयुक्त :-
त्वचेसंबंधित असणाऱ्या समस्यांवर जसे की ड्राय स्कीन असणे, खाज येणे, पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी जर्दाळू अत्यंत फायदेशीर असते आणि तसेच जर्दाळूचा वापर केल्याने सुरकुत्या ही नाहीश्या होता.
जर्दाळूचे तेल त्वचेचसाठी खूप गुणकारी आहे. हे तेल त्वचेत लवकर शोषले जाते आणि हे लावल्यामुळे त्वचा तेलकट असेल तर तो तेलकटपणा नाहीसा होतो.
३) रक्त शुध्दीकरणासाठी ही फायदेशीर ठरते :-
शरीर आणि रक्तातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी जर्दाळू उपयोगी राहते. जर्दाळुमध्ये लोह असल्यामुळे अशक्तपणापासून ते आपल्याला सुरक्षित ठेवते.
त्यामुळे आपले शरीर आरोग्यदायी राहते आणि अशक्तपणामुळे होणाऱ्या इतर आजारांपासून आपल्याला सुटका सुटका मिळते. जर्दाळूच्या सेवनामुळे रक्तप्रवाहाची गतीचे प्रमाण वाढते आणि रक्त शुध्दीकरणासाठी त्याचा फायदा होतो.
४) हृदयरोगासाठी फायदेशीर ठरते :-
जर्दाळू मध्ये जास्त प्रमाणात फायबर रेट असल्यामुळे हृदयासाठी ते चांगले असते. जर्दाळुचे सेवन कखराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते आणि त्यामुळे हृदयरोग दूर करण्यास मदत होते.
यामध्ये पोटॅशियम असल्या कारणामुळे ही हाडे मजबूत असतात आणि त्यामुळे हृदयरोगासाठी ते फायदेशीर ठरते.
५) डोळ्याच्या (दृष्टी) आरोग्यासाठी :-
जर्दाळूला रंग देणारे रंगद्रव्य डोळ्याचे आरोग्य सुरक्षित ठेवते. व्हिटॅमिन ए, सी आणि ई जर्दाळू मध्ये असल्याकारणामुळे दृष्टीच्या संबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता कमी प्रमाणात असते.
त्यामुळे मोतीबिंदू होण्याचा धोका कमी प्रमाणात जाणवतो. दिवसातुन 2-3 जर्दाळू सेवन केल्यामुळे व्यक्तींमध्ये वय-संबंधित मॅक्युलर र्हास होण्याचा धोका कमी प्रमाणात असतो.
६) हाडे मजबूत होतात :-
हाडांचे आरोग्य सुधारते जर्दाळूमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम असते ज्यामुळे हाडांचा विकास होण्यास ते मदत करतात आणि आरोग्यासाठी ते खूप महत्वाचे ठरते.
विशेष म्हणजे, योग्य शोषण आणि कॅल्शियम वितरणासाठी पोटॅशियम देखील महत्वाचे आहे आणि जर्दाळू देखील पोटॅशियम युक्त असल्यामुळे हाडे मजबूत राहण्यास त्याची मदत होते.
७) रक्त गुठळ्या :-
शरीरात खुल्या जखमेच्या रूपाने रक्ताचे नुकसान होऊ नये म्हणून आपले रक्त गुंडाळले केले पाहिजे. जेणेकरून उच्च व्हिटॅमिन के सह जर्दाळू रक्त गुठळ्या चे प्रमाण शारीरिक आरोग्या नुसार व्यवस्तीत राहते. ज्यांना रक्त गुठल्याचा त्रास होत असल्यास त्याने हे सेवन करू नये.