प्रतिनिधी : – नूतन पाटोळे
१) चाफ्याची साल, मुळी, पाने, फुले एकत्र कुटून त्याचा मोहरीचे तेल व त्याच्या चार पट खोबऱ्याचे तेल मिसळून त्याचे मिश्रण तयार काढावा तेवढेच करावे याचा उपयोग सांधेदुखोवर, अंगदुखी, कंबरदुखीवर केल्यास आराम मिळतो.
२) गळू (टॉन्सिल) वर चाफ्याच्या झाडाचा चीक उपयोगी आहे.
३) चाफ्याची शेंग उगाळून लावल्यास सापाचे विषसुद्धा उतरते असे म्हणतात.
४) कोणत्याही कारणाने नाकात मास वाढले की त्याला ऑपरेशन शिवाय पर्याय नाही परंतु चाफ्याच्या फुलांचा सतत वास घेतला आणि नाकात सैधवादी तेल आणि वचादी तेलाचे मिश्रण टाकल्यास मास नाहीसे होते. नाकात येणारा फोड (माळीण) फुलांच्या वासामुळे बरा होतो.
५) चाफ्याची फुले उत्तेजक, दाहनाशक आणि नेत्र ज्योतिवर्धक असतात. ६) चाफ्याच्या फुलांपासून अत्तर तयार करतात.
७) डोकेदुखीवर चाफ्याची पाने वाटून रस लावावा.