उत्सवमहाराष्ट्र

गुजर प्रशालेत व्याख्यानमाला उत्साहात संपन्न

प्रतिनिधी :- भगवान खुर्पे

तळेगाव ढमढेरे तालुका शिरूर येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत शनिवार दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी लोकमान्य टिळक व लोकशाहीर जयंती दिनानिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन स्वातंत्र्यसैनिक राजकुमार बी गुजर प्रशाला व स्नेहबंध या इयत्ता दहावी 1996 च्या विद्यार्थींनी आयोजित केले होते. हे व्याख्यान प्रसिद्ध व्याख्याते राज्य राष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध प्रकाशित असणारे,उत्कृष्ट लेखक प्राध्यापक विक्रम कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्रतिमांचे पूजन विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे, माजी संचालक घोडगंगा, सहकारी साखर कारखाना कैलास सोनवणे, यश नर्सिंग होम चे डॉक्टर चंद्रकांत केदारी, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय नरके, संदीप जगताप, अविनाश शिंदे, प्रकाश ढमढेरे ,दौलत भुजबळ, माणिक भूमकर, संदीप ढमढेरे, लक्ष्मण नरके, विजय भुजबळ, विनोद जेधे आदी मान्यवरांच्या हस्ते झाले.
आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना आदर्श चरित्र कसे घडवावे व बिकट परिस्थितीतून मार्ग काढत आपल्या कलागुणांना कसा वाव द्यावा याचे सर्व विद्यार्थ्यांना उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले. यावेळी डॉक्टर चंद्रकांत केदारी यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधला व महेश ढमढेरे यांनीही विद्यार्थ्यांना आदर्श व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आपल्या आचरणात सकारात्मक बदल कशा पद्धतीने करावे याचे उत्तम मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक दहिफळे पर्यवेक्षक मोहन ओमासे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष अविनाश कुंभार यांनी केले व कार्यक्रमाचे आभार सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष चंद्रशेखर सातपुते यांनी मानले.

Spread the love

Related posts

” उत्कृष्ट पोलीस पाटील” पुरस्काराने भारती उंद्रे सन्मानित

admin@erp

रस्त्यावर पाणी साचल्याने होडी चालवत आंदोलन… मांजरीतील नदीच्या पुलाजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा …

admin@erp

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदी शशिकांत गायकवाड..

admin@erp