पुणेमहाराष्ट्रसामाजिक

क्रांतिकारक विष्णू गणेश पिंगळे यांचे कार्य प्रेरणादायी- डॉ मुसमाडे

प्रतिनिधी :- भगवान खुर्पे


तळेगाव ढमढेरे दि.9 :- थोर क्रांतिकारक व तळेगाव ढमढेरे गावचे भूषण हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांनी देशासाठी केलेले कार्य व सर्वस्वाचा केलेला त्याग युवकांना प्रेरणादायी आहे, असे मत डाॅ. अर्जुन मुसमाडे यांनी व्यक्त केले.
शिक्षण प्रसारक मंडळाच्या साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयातील इतिहास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमानेखुर्पे आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमात डाॅ. अर्जुन मुसमाडे बोलत होते. ब्रिटिश सत्तेच्या जोखडातून भारताला मुक्त करण्यासाठी गदर संघटनेच्या माध्यमातून ब्रिटिश सत्तेच्या विरोधात उठाव करण्याचे नियोजन करून त्यासाठी भारतीय लष्करात उठाव करण्याचा प्रयत्न केल्यामुळे वयाच्या 26 व्या वर्षी त्यांना फाशी देण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डाॅ. पराग चैधरी, तळेगाव ढमढेरे गावच्या सरपंच सौ. स्वातीताई लांडे, ग्रामविकास अधिकारी श्री. राजेंद्र सात्रस, श्री संदीपअण्णा ढमढेरे माजी अध्यक्ष, संजय गांधी निराधार योजना, स्वा. सै. रायकुमार बी. गुजर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. अशोक दहिफळे , इतिहास विभाग प्रमुख डाॅ. पद्माकर गोरे, डाॅ. विवेक खाबडे, डाॅ. संदीप सांगळे, डाॅ. मनोहर जमदाडे, डाॅ. रविंद्र भगत, डाॅ. अमेय काळे, डाॅ. प्रिती पवार, डाॅ. शाकुराव कोरडे, डाॅ. संभाजी शिंदे प्रा. आकाश मिसाळ, प्रा. राम कराळे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. याप्रसंगी डाॅ. पराग चौधरी, सौ. स्वातीताई लांडे, श्री. राजेंद्र सात्रस यांनी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ. पद्माकर गोरे, आभार डाॅ. विवेक खाबडे यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ. शाकुराव कोरडे यांनी केले.

Spread the love

Related posts

अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या हवेली तालुका अध्यक्ष पदी बापूसाहेब कंद तर उपाध्यक्षपदी सचिन उंद्रे

admin@erp

विद्यार्थ्यांनी अनुभवला वारकरी दिंडी सोहळा

admin@erp

आव्हाळवाडी माळवाडी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ..

admin@erp