आयुर्वेदिकआरोग्य

कडू कारल्याचे फायदे…

प्रतिनिधी :- नूतन पाटोळे

           *कफापासून मुक्ती – कारल्यात फॉस्फरसचे प्रमाण अधिक असते. दररोज एक महिना कारल्याच्या सेवनाने कफाचा जूना त्रासही दूर होण्यास मदत होते. खोकल्याच्या त्रासावरही कारले गुणकारी ठरते.
           *रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यात-
मधुमेहींसाठी कारले वरदान ठरते. कारल्याच्या रसात सम प्रमाणात गाजराचा रस घालून प्या. त्यामुळे ब्लड शुगर नियंत्रित राहील. सकाळच्या वेळेस कारल्याचा रस घेणे फायदेशीर ठरेल.
           *स्टोनची समस्या असणाऱ्यांसाठी फायदेशीर-
स्टोनची समस्या असल्यास कारल्याचा रस पिणे किंवा भाजी खाणे फायदेशीर ठरते. त्यामुळे स्टोनची समस्या कमी होण्यास मदत होते. 20 ग्रॅम कारल्याच्या रसात मध आणि थोडेसे हिंग घाला आणि प्या.
           *भूक लागल्यास साहाय्यक-
कमी भूक लागत असल्यास कारल्याचे सेवन करा. भूक वाढीस मदत होते. भूक न लागल्यामुळे नीटसे खाल्ले जात नाही. त्यामुळे शरीराचे पोषण होत नाही. परिणामी स्वास्थ्यासंबंधिचे अनेक समस्या सुरू होतात. यावर कारल्याचा रस घेणे किंवा भाजी खाणे उपयुक्त ठरते.
           *त्वचारोगावर लाभदायी-
खरुज, सोरॉसिस यांसारख्या त्वचा रोगांवर कारल्याचा रसात लिंबाचा रस घालून पिणे लाभदायी ठरते.
           *डायरियावर गुणकारी-
कारल्याच्या रसात थोडेसे पाणी आणि काळे मीठ घालून त्याचे सेवन करा. यकृतासंबंधिचे काही आजार असल्यास त्यावर कारले गुणकारी ठरेल. अर्धा कप पाण्यात एक दोन चमचे कारऱ्याचा रस घालून घेतल्यास डायरियावर फायदा होईल.
           *जाडेपणावरही उपयुक्त-
कारल्याच्या रसात एक चमचा लिंबाचा रस घालून रोज सकाळी दोन महिन्यांपर्यंत सेवन केल्यास शरीरात तयार होणारे टॉक्सिन्स दूर होतात आणि जाडेपणा कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर यामुळे पचनतंत्र सुधारते आणि सुटलेले पोट कमी होण्यास मदत होते.

Spread the love

Related posts

रोज कच्चा कांदा खाण्याचे फायदे.

admin@erp

सदाफुली अर्काचे उपयोग:

admin@erp

उडीद डाळ खाण्याचे फायदे.

admin@erp