आयुर्वेदिकआरोग्य

ओवा खाण्याचे फायदे…

प्रतिनिधी :- नूतन पाटोळे

• अचानकपणे पोटात मुरडा आला किंवा पोट दुखू लागलं तर घरातील गृहिणी पटकन थोडासा ओवा खायला देते. ओवा खाल्ल्यामुळे पोटदुखी बरी होते.
• पोट दुखणे, शौचास न होणे किंवा पोट फुगणे या तक्रारींमध्ये चिमुटभर ओवा आणि थोडसं सैंधव मीठ एकत्र करुन खावे.
• वारंवार लघवीला होत असल्यास गूळ आणि ओवाचूर्ण समप्रमाणात घेऊन त्याची लहानशा गोळ्या कराव्यात. या गोळ्या चार-चार तासांनी खाव्यात.
• पोटात आग होत असल्यास किंवा जळजळत असल्यास ओवा, बडीशेप, ज्येष्ठमध एकत्र करुन खावं.
• लहान मुलांचे पोट दुखत असेल तर ओवा अर्क बेंबीभोवती गोलाकार चोळून पोट शेकवावे.
• ओवा खाल्ल्यानंतर कायम पाणी प्यावे. कारण ओवा उष्ण असल्यामुळे बऱ्यात वेळा तोंड येण्याची शक्यता असते.
• अनेक वेळा दूध पचायला जड जातं. काहींना दूध प्यायल्यावर त्रास होतो. अशांनी दूध प्यायल्यावर चिमूटभर ओवा चावून खावा.
• अनेक वेळा लहान मुलांनी अंथरुणात लघवी करण्याची सवय असते. अशा वेळी किंचितसा ओवा गुळासोबत मुलांना खायला द्यावा.
• एखादा डाळीच्या पिठापासून पदार्थ तयार करायचा असेल तर त्यात चिमुटभर ओवा घालतात. त्यामुळे पोटात गॅस धरत नाही.

Spread the love

Related posts

कॅलेंडुला फुलाचे फायदे…प्रामुख्याने त्वचेच्या आरोग्यासाठी आणि जखमा बरे करण्यासाठी वापरली जातात. 

admin@erp

दही खाण्याचे फायदे…

admin@erp

जर्दाळू खाण्याचे फायदे …

admin@erp