पुणेमहाराष्ट्रसंपादकीयसामाजिक

आव्हाळवाडी माळवाडी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ..

प्रतिनिधी : – आशोक आव्हाळे

मांजरी ता.२६: पुणे जिल्हा परिषदेच्या जिल्हा वार्षिक योजना २०२४-२५ मधील जनसुविधा विशेष अनुदानातून, जिल्हा नियोजन समितीच्या मान्यतेने या रस्त्यासाठी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. ग्रामपंचायत आव्हाळवाडी अंतर्गत वार्ड नं. ५ मधील आव्हाळवाडी ते माळवाडी रस्त्याच्या कामाचा नुकताच शुभारंभ हवेली पंचायत समितीचे माजी सभापती नारायण आव्हाळे, सरपंच नितीन घोलप, उपसरपंच पल्लवी आव्हाळे,माजी सरपंच रामदास आव्हाळे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मंजुरीनंतर या कामास सुरूवात झाली आहे. यादरम्यान कोमल आव्हाळे,मा.उपसरपंच राहुल सातव,मंगेश सातव,प्रशांत सातव,शरद आव्हाळे, अविनाश कुटे,विक्रम कुटे, राहुल हरपळे,संतोष तांबे, अशोक आव्हाळे,दत्तात्रय आव्हाळे, अमोल आव्हाळे यांच्यासह सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.या रस्त्याच्या कामामुळे परिसरातील नागरिकांना वाहतुकीच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळणार असल्याचे मत नारायण आव्हाळे यांनी व्यक्त केले.

Spread the love

Related posts

सत्यशोधक डॉ.हरी नरके पुरस्काराने प्रा.अशुतोष ढमढेरे सन्मानित

admin@erp

तळेगाव ढमढेरे उपसरपंचपदी मनोज आल्हाट बिनविरोध

admin@erp

मांजरी परिसरात योग दिन साजरा..

admin@erp