पुणेमहाराष्ट्र

आलेगाव पागा येथे वन विभागाच्या माध्यमातून बिबट जनजागृती मोहीम सुरू

प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे

आलेगाव पागा तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी ज्या ठिकाणी बिबट्या दिसत आहे त्या ठिकाणी आज पहाणी करण्यासाठी मधले नाहेर ऊसामध्ये दशरथ भोसले यांच्या शेतानजीक व निवासस्थान चया परीसरात व अनेक ठिकाणी बिबट्या रोज दिसत आहे त्याची पहाणी करण्यासाठी वनरक्षक सानप साहेब आले होते. आज आलेगाव पागा या ठिकाणी जिथे बिबट्या दिसला आहे तेथील शेतकरी यांचे कोल आले आहे. अशा अनेक ठिकाणी पहाणी करत आहे,तसेच जवळच आसवले यांच्या ऊस तोडणी शेतात ऊस तोडणी मजूर काम करीत असताना तेथील लहान मुले एकटेच ईकड तिकडे खेळताना दिसले लगेच साहेबांनी ऊस तोडणी मजुरांना एकत्र बोलावून त्यांना बिबट हल्या पासून बचाव करण्यासाठी मार्गदर्शन केले. लहान मुलांना एकटे ठेऊ नये या मुलांना एकत्र ठेवा व सोबत रहा बिबट्या दिसला तर आरडा ओरडा करा व वनविभागाशी संपर्क रात्री शेतात एकट्याने जाऊ नका,आपली गुरे वासरे शेळ्या मेंढ्या बंदीस्त गोठयातच बांधावे,ऊस मजुरांनी रात्री झोपडीत व बाहेर लाईट लावा व सावधगिरी बाळगावी अशा अनेक मार्गदर्शन केले. या प्रसंगी शरदराव रासकर,व नागेश निंबाळकर, राहुल भोसले,आदी शेतकरी ऊस तोडणी मजूर उपस्थिती होते तसेच आलेगाव पागा या ठिकाणी बिबट्या ला पकडून जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी यावेळी शरदराव रासकर सरचिटणीस भाजपा शिरूर तालुका यांनी केली सानप साहेब वनरक्षक यांनी लवकरात लवकर पिंजरा लावन बिबट्या ला जेरबंद केला जाईल असे सांगितले.

Spread the love

Related posts

मांजरी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत

admin@erp

अण्णासाहेब मगर महाविद्यालयाची हडपसर पोलीस ठाण्यात सायबर सुरक्षा जनजागृती

admin@erp

तळेगाव ढमढेरे येथे पारंपारिक पोत सोहळा संपन्न..

admin@erp