देशनोकरीपुणेमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिकसंपादकीय

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संजय उंद्रे तर उपाध्यक्षपदी नंदकुमार शेवाळे…

प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे

मांजरी ता.२४: मांजरी खुर्द (ता.हवेली) येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. संस्थेच्या अध्यक्षपदी संजय बाजीराव उंद्रे यांची, तर उपाध्यक्षपदी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष नंदकुमार साहेबराव शेवाळे यांची निवड करण्यात आली.
या दरम्यान नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश दादा जगताप व यशवंत सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन किशोर उंद्रे यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.
या दरम्यान आदर्श पतसंस्थेची १६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली असून सन २००१ ला अल्पबचत गट ते नागरी पतसंस्था हा प्रवास संस्थेनी यशस्वी पणे पार पाडला असून १४६ सभासदांची संस्था ५ कोटी अधिकृत भागभांडवलासह ,संस्था कर्जवाटप, सोनेतारण, वाहनकर्ज, दैनंदिन ठेव, बचत ठेव, मुदत ठेव अशा अनेक सुविधांमधे संस्था काम करत असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय उंद्रे यांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे संस्थापक उत्तम उंद्रे, शामराव बोरकर,शेवाळवाडीचे माजी सरपंच अशोक शेवाळे, माजी सरपंच सिताराम उंद्रे, स्वप्निल उंद्रे, रुपेश उंद्रे,माजी उपसरपंच रोहीदास पवार,व संचालक मंडळ उपस्थित होते.

Spread the love

Related posts

तळेगाव येथे उपद्रवी हुमणी किड प्रतिबंध प्रशिक्षण संपन्न.

admin@erp

उत्कृष्ट पोलीस पाटील” पुरस्काराने भारती उंद्रे सन्मानित ..

admin@erp

मांजरी, वाघोलीत ढोल ताशांच्या तालावर सर्जा राजाच्या मिरवणुका..

admin@erp