पुणेमहाराष्ट्रशैक्षणिक

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात “संविधान निर्मिती” माहितीपटाचे सादरीकरण

प्रतिनिधी :- नूतन पाटोळे

मांजरी ता.२०: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात ‘फिल्म क्लब’अंतर्गत राज्यघटनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल “संविधान निर्मिती” या विषयावर आधारित माहितीपटाचे आयोजन राज्यशास्त्र विभागातर्फे करण्यात आले होते. सदर माहितीपटाद्वारे “संविधान निर्मितीच्या प्रक्रियेचा प्रवास” दाखविण्यात आला.

महाविद्यालायाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान स्वातंत्र्य, समता, बंधुता मूल्यांवर आधारलेले आहे. सविधानाने दिलेल्या अधिकारांबरोबर कर्तव्ये देखील महत्त्वाची आहेत. असे सांगितले.

राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राहुल नरंगळकर यांनी, “संविधान हे माणसाला गुलामगिरीतून मुक्त करण्याचे आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचे साधन आहे” असे मत व्यक्त केले.

सदर कार्यक्रमास महाविद्यालायाचे उपप्राचार्य डॉ शुभांगी औटी, डॉ. दत्तात्रय टिळेकर, डॉ. गंगाधर सातव डॉ. दत्तात्रय संकपाळ आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन काशिनाथ दिवटे, प्रा. ऋषिकेश साळुंके, प्रा. श्रीकृष्ण थेटे यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मनिषा जरक यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थी सोहम शितोळे याने केले.

Spread the love

Related posts

आमदार कटके यांनी घेतली पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांची भेटनगर महामार्गावरील वाहतुक कोंडी व आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर केली चर्चा..

admin@erp

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात मांजरी खुर्दने पटकाविला दुसरा क्रमांक.

admin@erp

सहकार मंत्रालयाच्या स्थापना दिनानिमित्त व्हॅम्निकॉम पुणे वॉकेथॉनचे आयोजन..

admin@erp