दोन दिवसात झालेल्या पावसाने 45 वर्षात पहिल्यांदाच मे महिन्यात उजनी धरण प्लसमध्ये आले आहे.
प्रतिनिधी : – अशोक आव्हाळे
इंदापूर ता.२७: राज्यभरात मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातही तुफान पाऊस सुरू आहे. पहिल्याच दिवशी मान्सूनच्या पावसाने रेकॉर्ड ब्रेक केला असून पाणलोट क्षेत्रात मे महिन्यात पहिल्यांदाच पाणी वाढण्यास सुरुवात झाली आहे. यंदा धरणे लवकर भरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुणे, सोलापूर, सातारा सांगली या भागात तुफान पाऊस झाल्याने धरण साठ्यात वाढ होत आहे. दोन दिवसात झालेल्या पावसाने 45 वर्षात पहिल्यांदाच मे महिन्यात उजनी धरण प्लसमध्ये आले आहे. राज्यभरातील लघु मध्यम व मोठ्या प्रकल्पांमध्ये धरण साठा वेगाने वाढत आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील एकूण धरणांमध्ये आता 28.45% पाणीसाठा शिल्लक आहे. या जलसाठ्यात वेगाने वाढ होत आहे.
45 वर्षात पहिल्यांदाच मे महिन्यात उजनी प्लसमध्ये
सोलापूर , धाराशिव, पुणे आणि नगर जिल्ह्यासाठी महत्त्वाचे समजलं जाणारा उजनी धरण मे महिन्यात पहिल्यांदाच उपयुक्त साठ्यात प्लस मध्ये आले आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे उणे 20 टक्क्यांवर पोहोचलेला उजनीतील पाणीसाठा 45 वर्षांमध्ये पहिल्यांदाच मे महिन्यात प्लसमध्ये आला आहे. 25 आणि 26 मे रोजी झालेल्या पावसाने उजनी धरणामध्ये पाणी पातळीत वाढ झाली आहे.