पुणे (प्रतिनिधी)
कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन अंतर्गत आढावा बैठक महादेव मंदिर येथे उत्साहात पार पडली.या बैठकीस ग्रामस्थ, महिला मंडळ, युवा मंडळ, बालपंचायत सदस्य तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावच्या सरपंच आशिया तांबोळी, कृषी अधिकारी अर्चना वाघदरे, डॉ. सीमा आव्हाड, समाजसेवक शहाजी दळवी, योजक संस्थेच्या कांचन वाळुंज, सुरेखा पुंडे, आरोग्य विभागाचे अमोल जाधव, बचत गटाच्या अध्यक्षा वर्षा घोलप, तांबोळी मॅडम, आनंद उबाळे, ग्रामस्थ, महिलावर्ग यांची विशेष उपस्थिती लाभली.बैठकीदरम्यान गावातील विविध उपक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बालहक्क, शिक्षण, बालविवाह प्रतिबंध, बालमजुरी निर्मूलन तसेच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाचे मार्गदर्शन CHO सीमा आव्हाड मॅडम यांनी केले. त्यांनी आरोग्य विषयक महत्त्वपूर्ण माहिती देत गावाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी CSW भुषण कोकाटे आणि APO चेतन काळे यांनी विशेष परिश्रम घेतले. समाजसेवक शहाजी दळवी यांनी संस्थेने केलेल्या कामाचे आभार मानत उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.गावाच्या विकासासाठी आणि बालसुरक्षेसाठी अशा बैठका मार्गदर्शक ठरत असून ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग कौतुकास्पद आहे.
