आयुर्वेदआरोग्य

मांजरीत बिबट्याची दहशत कायम, कुत्र्याला केले भक्ष्य

पुणे /प्रतिनिधी

मांजरी ता.१३:(प्रतिनिधी): मांजरी खुर्द (ता.हवेली ) येथे मांजरी वाघोली रस्त्याच्यालगत हॉटेल सूर्याच्या समोर शेतकरी पोपट गणपत उंद्रे यांच्या दारातील कुत्र्यावर गुरुवारी (ता.१२) रोजी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास त्यांच्याच शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला चढवत त्याचा पाठलाग करत भक्ष्य करून घेऊन गेला. येथे असणारी बाकीची कुत्री भुंकत होती ती का भुंकतात म्हणून आशिष उंद्रे यांनी बाहेर पाहिले तर त्यांना काही दिसले नाही परंतु त्यांनी सीसीटीव्ही मध्ये पाहिल्यानंतर बिबट्याने आपल्या दारातील कुत्र्याला नेल्याचे समजले. बिबट्याची मांजरी परिसरातील दहशत कायम असून गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी मेंढपाळाच्या मेंढ्यांवरतीही बिबट्याने हल्ला केला होता.बिबट्याने कुत्र्यावर केलेला हल्ला पोपट उंद्रे यांच्या घरातील सीसीटीव्ही फुटेज मध्ये त्याचे चित्रीकरण कैद झाले आहे. या बिबट्याचा मांजरी कोलवडी परिसरात मोठ्या प्रमाणात वावर वाढल्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतातील बिबट्या आता गावात घरासमोर येऊ लागल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.जर बिबट्याने माणसावरती हल्ला केला तर आता करायचे काय ?असा प्रश्न निर्माण झाला आहे. वनविभागाने या बिबट्याला पकडण्यासाठी लवकरात लवकर पिंजरा लावून त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी पोपट उंद्रे, पोलीस पाटील भारती उंद्रे, माजी सरपंच रुपेश उंद्रे यांनी केली आहे.

साप्ताहिक ज्ञानलीला वृत्तपत्र

Related posts

अष्टांग योग म्हणजे 

admin@erp

योग म्हणजे काय?

admin@erp

गुलाब फुलाचे प्रमुख फायदे:

admin@erp

Leave a Comment