पुणेमहाराष्ट्र राज्यराजकीय

आव्हाळवाडी थेऊर जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचे वर्चस्व

तीनही उमेदवार बहुमताने विजयी

मांजरी (प्रतिनिधी):हवेली तालुक्यातील जिल्हा परिषद गट क्रमांक ४० थेऊर आव्हाळवाडी आणि पंचायत समिती गण क्रमांक ७९ व ८० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार गट दणदणीत विजय मिळवत विरोधकांना जबरदस्त दिला आहे. तिकीट वाटपापासून प्रचाराच्या अखेरपर्यंत सुरू असलेल्या अंतर्गत मतभेद आणि राजकीय चर्चांवर मात करत राष्ट्रवादीच्या तिन्ही उमेदवारांनी भाजपचा पूर्णपणे धुवा उडवला. हे तीनही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष व गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला तर विजयी उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेत त्यांचे आभार व्यक्त केले.
पुणे जिल्हा परिषदेच्या झालेल्या निवडणुकीत आव्हाळवाडी थेऊर जिल्हा परिषद गट क्रमांक ४० मधुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार कोमल संदेश आव्हाळे १४ हजार १४६ मताधिक्याने विजयी झाल्या. त्यांना २२ हजार ३४३ मतं मिळाली. तसेच थेऊर पंचायत समिती गण क्रमांक ७९ मधुन युवराज हिरामण काकडे ५२१२ मतांनी विजयी झाले. त्यांना ९१६६ मतं मिळाली.तसेच आव्हाळवाडी पंचायत समिती गण क्रमांक ८० मधून सुषमा संतोष मुरकुटे ५२६१ मतांनी विजयी झाल्या. त्यांना ११२४८ मत मिळावित दणदणीत विजय संपादन करत आव्हाळवाडी थेऊर गटात राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला आहे. या तिन्ही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार निवडून आल्याने या गटात राष्ट्रवादीचे वर्चस्व सिद्ध झाले आहे.

साप्ताहिक ज्ञानलीला वृत्तपत्र

Related posts

Travel Update – Detroit named second best city for 2018 travel destinations

admin@erp

Thong jeans are just the latest weird fashion trend

admin@erp

The top street style trends of spring 2018 fashion month

admin@erp

Leave a Comment