प्रतिनिधी :- निलेश जगताप
हरे राम हरे कृष्ण सेवा फाउंडेशन ( कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य ) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उद्योजक कल्याणराव घाबने व उद्योजक गौतम रासकर यांच्या वतीने आलेगाव पागा वाडी वस्ती या ठिकाणी गोर गरीब, अनाथ, अपंग,अशा अनेक व्यक्तींना दिपाली निमित्ताने फराळ वाटप करण्यात आले , दरवर्षी हरे राम हरे कृष्ण फाउंडेशन च्या माध्यमातून व अनेक दानशूर व्यक्तींच्या मदतीने दिपावली सणाच्या निमित्ताने हा फराळ वाटप कार्यक्रम करण्यात येतो , हरे राम हरे कृष्ण फाउंडेशन च्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य करणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष शरदराव रासकर यांनी आपले मत व्यक्त केले तसेच उद्योजक गौतम रासकर, उद्योजक कल्याणराव घाबणे यांचे आभार मानले या प्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये विजय बेनके सचीव हरे राम हरे कृष्ण सेवा फाउंडेशन ,विषाल आवचीते पोलिस पाटील आलेगाव पागा,प्रशांत रासकर विश्वस्त हरे राम हरे कृष्ण सेवा फाउंडेशन ,अरूण वाघचौरे सामाजिक कार्यकर्ते,आदी गोर गरीब, अनाथ,अपंग व भैरवनाथ देवस्थान पुजारी बापु गायकवाड सह अनेक मान्यवर उपस्थित होते. अशी माहिती शरदराव रासकर सरचिटणीस भाजपा शिरूर तालुका, संस्थापक अध्यक्ष हरे राम हरे कृष्ण सेवा फाउंडेशन यांनी माहिती दिली आहे.

