हडपसर : आशीर्वाद पाईप्स आणि विश्वास सेल्स कॉर्पोरेशनच्या वतीने परिसरातील प्लंबर्सना मोफत हेल्मेट वाटप करण्यात आले
प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे
हडपसर, ता. २८ : आशीर्वाद पाईप्स आणि येथील विश्वास सेल्स कॉर्पोरेशन यांच्या वतीने परिसरातील प्लंबर्सना सुरक्षितता मोहिमेअंतर्गत मोफत हेल्मेट वाटप करण्यात आले. वाहतूक पोलिसांनी यावेळी रस्ते सुरक्षेबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
आशीर्वाद पाईप्सचे शहर विभागीय व्यवस्थापक किशोर रसाळ, अण्णासाहेब भवणे, हडपसर पोलिस ठाण्यातील वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक निलेश जगदाळे, राजेंद्र करणकोट, निशा कोंडे-साळुंखे आदी यावेळी उपस्थित होते.
…………………………………….
