प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे
मांजरी ता.२३ : जागतिक सहकार वर्ष २०२५ निमित्त सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कार्य, विश्वासार्ह सेवा व सामाजिक बांधिलकी जपत सातत्याने कार्य करणाऱ्या हडपसर येथील सन्मित्र सहकारी बँकेला प्रतिष्ठित ‘ग्रीन वर्ल्ड को प्राईड पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे, ही बॅंकेच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची बाब आहे. सहकाराच्या मूल्यांना जपत पर्यावरणपूरक विचार, आर्थिक शिस्त व समाजाभिमुख उपक्रमांतून सन्मित्र सहकारी बँक आदर्श निर्माण करत असल्याचे बॅंकेचे अध्यक्ष गणेश फुलावरे यांनी म्हटले आहे.
