Uncategorized

स्वातंत्र्यानंतर प्रथमच भिल्ल समाजाला मिळाले जातीचे दाखले..

प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे

मांजरी ता.२: थेऊर (ता. हवेली ) येथे गेली ५० वर्षापूर्वीपासून वास्तव्यास असलेल्या, भिल्ल समाजाला प्रदीर्घ काळानंतर, अखेर जातीचे दाखले उपलब्ध झाले आहेत. हा समाज गेली अनेक वर्षांपासून थेऊर येथे मासेमारी व ढोल पथकाचा व्यवसाय करीत आहे. या समाजाला दाखले उपलब्ध होण्यासाठी, गेली अनेक वर्ष झगडत होते, परंतु दाखले मिळू शकले नव्हते. अखेर थेऊर ग्रामपंचायत सदस्य युवराज हिरामण काकडे व माजी सदस्य विनोद माळी यांच्या अथक प्रयत्नातून व आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या सहकार्याने, अखेर १०० भिल्ल कुटुंबांना, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जातीचे दाखले उपलब्ध झाले आहेत.

हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील व हवेलीचे उपविभागीय अधिकारी यशवंत माने यांचे पारंपरिक वाद्य वाजवत स्वागत करण्यात आले. पुढे यांच्याच प्रमुख उपस्थितीत या कुटुंबांना जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी नायगाव येथीलही १०० भिल्ल समाजातील कुटुंबांना जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

या मिळालेल्या दाखल्यांमुळे, भिल्ल समाजातील येणारी पिढी ही चांगल्या प्रकारचे शिक्षण घेऊन सुशिक्षित होण्यास मदत होणार आहे. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभही या समाजाला मिळणार असल्याचे युवराज काकडे यांनी सांगितले.

यावेळी थेऊरचे मंडल अधिकारी किशोर जाधव, गाव महसूल अधिकारी सरला पाटील, सर्व महसूल विभागाचे अधिकारी तसेच अरुण संभाजी धारवाड, अमित धुळे, प्रशांत खांडे, सुरज सोनवणे, संग्राम गावडे, विशाल पवार, सलीम शेख, जयदीप दिवेकर, प्रकाश म्हस्के, दिपक शितोळे, रामदास बर्डे, गोवर्धन धारवाड, लहू पवार व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. प्रिंट व डिजिटल मिडिया हवेली अध्यक्ष संदीप बोडके व सामाजिक कार्यकर्ते गणेश कुंजीर यांचे याकामी विशेष सहकार्य लाभले.

मिळालेल्या जातीच्या दाखल्यामुळे भिल्ल समाजातील नागरिकांनी आनंद व्यक्त करत आभार मानले.

Spread the love

Related posts

श्री गजानन महाराज 115 वी पुण्यतिथी कार्यक्रम शिक्रापूर मध्ये संपन्न…

admin@erp

मध आणि मनुका सोबत खाल्ल्याने होतात हे फायदे …

admin@erp

मोगऱ्याच्या फुलांचे उपयोग

admin@erp