प्रतिनिधी नूतन पाटोळे
पद्धत : समस्थितीत उभे राहा. पायाचे अंगठे सरळ खालच्या बाजूला वळवा आणि सुमारे साडेचार फूट दूरवर पाहा. ही क्रिया करताना आपण विस्मरण दूर करून स्मरणशक्ती तीव्र आणि प्रखर बनवत आहोत अशी कल्पना करा. छातीच्या साहाय्याने २५ वेळा श्वासोच्छ्वास करा. या वेळी लक्ष टाळूच्या स्थानी एकाग्र करा.
लाभ :
टाळूच्या स्थानापासून शिखा मंडलापर्यंतचा (शेंडीचा भाग) भाग कफ विकारापासून मुक्त होतो.
मेंदूचा थकवा आणि विस्मृती दूर होते.
विक्षिप्त अवस्था बरी करण्यास साहाय्यभूत ठरते.
मानसिक शक्ती तीव्र बनते.
