प्रतिनिधी : – अशोक आव्हाळे
पुणे : राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या तीन महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होणार आहेत. निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी यासंबंधित घोषणा केली होती. प्रथम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाणार असून, त्यानंतर महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पूर्वी राज्यातील २९ महानगरपालिकांसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. या आदेशानुसार, राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेला गती दिली आहे. ३१ जानेवारी २०२६ पूर्वी राज्यातील २९ महानगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकांशी संबंधित प्रक्रियेला वेग दिल्याचे म्हटले जात आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०२५, डिसेंबर २०२५ आणि जानेवारी २०२६ या ३ महिन्यांमध्ये महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद यांच्या निवडणुका घेतल्या जातील.