पुणेमहाराष्ट्रशैक्षणिक

सोनेसांगवी शाळेचे शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेत दुहेरी यश.

प्रतिनिधी : – नीलेश जगताप

सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षात झालेल्या इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेमध्ये या शाळेने दुहेरी यश मिळवले आहे. जवाहर नवोदय विद्यालयासाठी आमच्या शाळेची ७७ वर्षाच्या इतिहासात प्रथम प्राजक्ता विनोद सदाफुले या विद्यार्थिनीची निवड झाली असून. शिष्यवृत्ती परीक्षेतही प्राजक्ताने 256 गुण मिळवले आहेत. जिल्हा गुणवत्ता यादीत झळकली आहे ,तसेच आदित्य उल्हास डांगे 242 गुण मिळवून मेरीटच्या उंबरठ्यावर येऊन थांबला आहे तसेच सृष्टी संदीप बोऱ्हाडे या विद्यार्थिनीला 238 गुण मिळाले आहेत.तर ओम सुरेश दाते या विद्यार्थ्याला 232 गुण मिळाले आहेत त्याचप्रमाणे 200 पेक्षा जास्त गुण मिळवणारे अजूनही पाच विद्यार्थी आहेत. इयत्ता पाचवीच्या वर्गाला वर्गशिक्षक श्री. गुलाबराव दगडू तळोले यांनी मार्गदर्शन केले.
शिष्यवृत्तीच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक श्री.नामदेव गायकवाड सर यांनी अभिनंदन केले तसेच केंद्रप्रमुख श्री.किसन पर्वती शिंदे सर, विस्तार अधिकारी श्री.खोडदे साहेब, गटशिक्षणाधिकारी कळमकर साहेब तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.शरद काळे, उपाध्यक्ष श्री.विजय बोऱ्हाडे व गावच्या सरपंच सौ रेखाताई मल्हारीशेठ काळे, शिरूर-आंबेगाव शिवसेना तालुकाप्रमुख श्री मल्हारीशेठ काळे यांनी विद्यार्थी व वर्गशिक्षकांचे अभिनंदन केले.

Spread the love

Related posts

मान्सून पुर्व पावसाने शुभकार्यात अडथळा

admin@erp

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदी शशिकांत गायकवाड..

admin@erp

शहर सुरक्षित आणि अतिक्रमणमुक्त करणे ही पी एम आर डी ए ची प्राथमिकता : आयुक्त डॉ. म्हसे

admin@erp