प्रतिनधी: – भगवान खुर्पे
तळेगाव ढमढेरे दि.२१
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तळेगाव ढमढेरे ता.शिरूर जि. पुणे येथील साहेबराव शंकरराव ढमढेरे कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये विद्यार्थिनी आरोग्य तपासणी शिबिर व वृक्षारोपण समारंभाचे आयोजन करण्यात आले. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष तसेच शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरे आणि विद्या सहकारी बँकेचे विद्यमान संचालक महेशबापू ढमढेरे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमांचे आज आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी महेशबापू ढमढेरे यांच्यासह शिरूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल रणदिवे, शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ.सुजित शेलार, भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव नवनाथ भुजबळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अर्जुन मुसमाडे, उपप्राचार्य प्रा. डॉ.पराग चौधरी, डॉ.संदीप सांगळे, विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी डॉ.रवींद्र भगत, प्रा. डॉ. पद्माकर गोरे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विवेक खाबडे, रणजीत तकटे, सचिन पंडित, स्वप्निल दिवटे, गुलाबराव भोसुरे, रोहित भुजबळ, आदिनाथ भुजबळ आदी याप्रसंगी उपस्थित होते.
या उपक्रमाचे प्रमुख आयोजक असलेले महेशबापू ढमढेरे यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुरदृष्टी असलेल्या नेतृत्वामुळेच महाराष्ट्र राज्य विकासाच्या गतिमान मार्गावर पुढे जात असल्याचे ते म्हणाले. या दोन्ही मान्यवर नेत्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तळेगाव ढमढेरे महाविद्यालयामध्ये शिक्रापूर येथील रेड रिबन क्लबच्या माध्यमातून आयोजित केलेल्या शिबिरामध्ये एकूण ८८ विद्यार्थिनींनी लाभ घेतला. तसेच महाविद्यालयाच्या परिसरामध्ये टिकाऊ स्वरूपाच्या साधारण ४५ वृक्षांचे रोपण या निमित्ताने करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन मुसमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली भूगोल विभाग प्रमुख डॉ.रवींद्र भगत यांनी वरील दोन्ही उपक्रमांचे यशस्वीपणे संयोजन केले. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. अश्विनी पवार, प्रा. कांचन गायकवाड, डॉ.मनोहर जमदाडे, डॉ.सोमनाथ पाटील, डॉ.अमेय काळे, प्रा.आकाश मिसाळ, प्रा.राम कराळे आदींनी विशेष परिश्रम घेतले.