पुणेराजकीय

सहकारी संस्थेच्या उपाध्यक्षपदी कमल भुजबळ यांची निवड…

प्रतिनधी: – भगवान खुर्पे

कमल भुजबळ यांची तळेगाव सोसायटीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सन्मान करताना

तळेगाव ढमढेरे दि.24 (वार्ताहर) :- तळेगाव ढमढेरे विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या उपाध्यक्षपदी कमल बबन भुजबळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याचे निवडणूक अधिकारी कैलास लोहार यांनी सांगितले.माजी उपाध्यक्ष राजेंद्र घुमे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदावर निवडणूक घेण्यात आली यामध्ये कमल भुजबळ यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे संस्थेचे अध्यक्ष संतोष ढमढेरे यांनी सांगितले.यावेळीपुणे जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब नरके,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती यशवंत ढमढेरे,अनिल भुजबळ,घोडगंगा कारखान्याचे उपाध्यक्ष पोपटराव भुजबळ,शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्षा विद्या भुजबळ,माजी पंचायत समिती सदस्य अरुण भुजबळ,माजी सरपंच बाळासाहेब भुजबळ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुदीप गुंदेचा ,माजी चेअरमन श्रीपती भुजबळ,रामभाऊ ढमढेरे, ज्ञानेश्वर भुजबळ,माजी व्हाइस चेअरमन राजेंद्र घुमे,अशोक शेलार,माजी तंटामुक्ती अध्यक्ष रमेशराव भुजबळ ,संचालक विजूपाटील ढमढेरे , बाळासाहेब ढमढेरे ,पुष्पा भुजबळ,संतोष भुजबळ,शहाजी ढमढेरे उपस्थित होते.

Spread the love

Related posts

बांधकाम विभागाने घेतली बातमीची दखल..

admin@erp

बँकेचे शटर तोडून प्रवेशही केला मात्र रिकाम्या हाताने परतले.

admin@erp

मांजरी कोलवडी रस्त्यावर खड्डेच खड्डे….

admin@erp