प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे
वाघोली ता.६: समुंद्रादेवी सोपानराव दाभाडे यांच्या स्मरणार्थ व दाभाडे परिवाराच्या वतीने वि.शे.सातव हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले.
या उपक्रमात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत गरजू विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ दाभाडे यांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गोरख गायकवाड (विश्वस्त, तुकाराम महाराज मंदिर),किरण भागवत ( कीर्तनकार), मुरलीधर मगर, मा.जि.प. सदस्य रामदास दाभाडे,राजेंद्र सातव,नारायण सातव,सिताराम सातव,भागवत चव्हाण,बाळासाहेब सातव,राजेंद्र पायगुडे,शेख सर, विलास वीर,अनिल जाधवराव,हरिभाऊ पाचरणे,एन.के. निंबाळकर,कृष्ण डोंगरे,चंद्रकांत कोलते,मीनाताई सातव,जयश्री सातव, सुरेश जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सदैव मदतीचा हात देण्याचे आश्वासन दाभाडे यांनी दिले. शाळेतील शिक्षक व पालक वर्गाने या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.