महाराष्ट्रसामाजिक

समता फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने कान्हूर मेसाई येथे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन.

प्रतिनिधी :- निलेश जगताप

कान्हूर मेसाई येथे समता फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिर महादेव मंदिरातील सभामंडपात करण्यात आले होते. या शिबिरामध्ये गावातील, परिसरातील अनेक नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरामध्ये रुग्णांना योग्य मार्गदर्शन करत, मोतीबिंदू झालेल्या रुग्णांना समता फाउंडेशनच्या सहकार्याने, ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे या ठिकाणी मोतीबिंदू ऑपरेश शस्त्रक्रिया करण्यात आल्या. फाउंडेशनच्या माध्यमातून ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे येथे नऊ रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
या शिबिराप्रसंगी सरपंच आशिया तांबोळी, समाजसेवक शहाजी दळवी, राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस बबन शिंदे, उपसरपंच सोपान पुंडे, सचिव सदाशिव पुंडे, मा.अभियंता बाबुराव ननवरे, एडवोकेट तुकाराम पुंडे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. कान्हूर मेसाई व परिसरात विविध संस्था, फाउंडेशन शिक्षण क्षेत्रात, आरोग्य, जलसंधारण, शेती विषयक मार्गदर्शन करत, या परिसरातील नागरिकांना, शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना लाभ मिळवून देत असल्याचे समाजसेवक शहाजी दळवी यांनी सांगितले. खाजगी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करताना होणारा खर्च मोठ्या प्रमाणात असतो, या फाउंडेशनच्या वतीने मोफत नियोजन करण्यात आल्यामुळे परिसरातील सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना सहकार्य होत आहे.
ग्रामस्थांच्या वतीने समता फाउंडेशन मुंबई व ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे यांचे आभार मानण्यात आले.

Spread the love

Related posts

शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करून घ्यावी: अप्पर जिल्हाधिकारी, सरिता नरके..

admin@erp

” उत्कृष्ट पोलीस पाटील” पुरस्काराने भारती उंद्रे सन्मानित

admin@erp

तीनच्या प्रभागावर फुली, सोळा प्रभागांची रचना हालली!

admin@erp