पुणेमहाराष्ट्रसामाजिक

सत्यशोधक डॉ.हरी नरके पुरस्काराने प्रा.अशुतोष ढमढेरे सन्मानित

प्रतिनिधी :- भगवान खुर्पे

तळेगाव ढमढेरे,(वार्ताहर) :-ज्येष्ठ विचारवंत प्रा.हरी नरके यांनी फुले,शाहू,आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून त्यांच्या कार्याचा व विचारांचा प्रसार आपल्या लेखणीतून करून महात्मा ज्योतिबा फुलेंचे साहित्य समाजापुढे आणले असे मत व्याख्याते प्रा.संतोष वीरकर यांनी तळेगाव ढमढेरे येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले विचार मंचाच्या वतीने आयोजित प्रा.हरी नरके यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित बोलताना व्यक्त केले.
तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील संत शिरोमणी मंगल कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तळेगाव ढमढेरे येथील शेतकरी कुटुंबातील प्रा. आशुतोष ढमढेरे यांना शैक्षणिक क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल सत्यशोधक डॉ.हरी नरके पुरस्कार सपत्नीक देण्यात आला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अरविंद ढमढेरे, माजी पंचायत सदस्य आबासाहेब गव्हाणे, माजी उपसभापती अनिल भुजबळ, समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष सोमनाथ भुजबळ, मंत्रालयाचे कक्ष अधिकारी किशोर जकाते, तहसीलदार विजय बनसोड, ग्रामपंचायत सदस्य ॲड.सुरेश भुजबळ, किशोर रासकर, संदीप ढमढेरे, उमेदचे समन्वयक अनिल नरके,कैलास नरके यांनी प्रा.हरी नरके यांच्या कार्याची माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच स्वाती लांडे,उपसरपंच किर्ती गायकवाड, वंदना भुजबळ, डॉ.चंद्रकांत केदारी, आरपीआय शिरूर तालुका अध्यक्ष नवनाथ कांबळे, बसपाचे नेते सोमनाथ कुदळे, संभाजी भुजबळ पतसंस्थेचे उपाध्यक्ष रमेश भुजबळ, शिवसेनेच्या चेतना ढमढेरे,सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण नरके, संजय जकाते, मंगेश नरके उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कक्ष अधिकारी किशोर जकाते तर स्वागत ग्रामपंचायत सदस्य ॲड. सुरेश भुजबळ, सूत्रसंचालन श्रीकांत नरके, आभार शिवसेनेचे कैलास नरके यांनी केले.

Spread the love

Related posts

45 वर्षांत पहिल्यांदाच मेमध्ये उजनी प्लसमध्ये

admin@erp

अरूणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने पुरंदर तालुक्यातील काळदरी शाळेतील मुलांना वह्या पेन वाटप…

admin@erp

नागपंचमी निमित्त विद्यार्थ्यांमध्ये सापांविषयीची जनजागृती..

admin@erp